(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर आजतागात अनेक थक्क करणारे व्हिडिओज शेअर आणि व्हायरल झाले आहेत. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे बरेच व्हिडिओज तुम्ही इथे पाहिले असतील. इथे बऱ्याचदा काही विचित्र स्टंट्स देखील व्हायरल होत असतात. लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन वाटेल ते करू पाहतात मात्र यात अनेकदा त्यांचा जीव देखील धोक्यात पडत असतो. लोक आपला जीव धोक्यात टाकून हे असे जीवघेणे स्टंट्स करतात आणि मग जीवाचे बरेवाईट झाले की, पश्चाताप करत बसतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका जीवघेण्या आणि तितकाच थरारक अशा स्टंटबाजीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. यात एक तरुण चालू आकाशपाळण्यावर चालताना उड्या मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ एका जत्रेतील आहे, जिथे सर्व लोक जत्रेची मजा लुटत असताना तरुण आपला वेगळाच प्रकार करताना दिसून आला. हे सर्व दृश्य पाहून तेथील सर्वचजण हादरले. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आणि मग सोशल मीडियावर शेअर केला. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला चालू जत्रेतील काही दृश्ये दिसू लागतील. इथेच तुम्हाला एक आकाशपाळणा दिसेल, ज्यावर एक व्यक्ती आपली स्टंट्सबाजी दाखवत आहे. मुख्य म्हणजे, हा आकाशपाळणा गरगर फिरत असताना व्यक्ती हा जीवघेणा स्टंट्स करू पाहतो. अंग झोकून तो यावर उड्या मारतो, लटकतो मात्र सुदैवाने त्याला यात काही होत नाही, फार तरबेजपणे तो हा स्टंट्स करून दाखवतो. यात त्याला जरी काय झाले नसले तरी लोकांना मात्र यामुळे धक्काच बसला. दरम्यान असे जीवघेणे स्टंट्स आपल्या जीवावर देखील बेतू शकतात, सोशल मीडियावर अशा कारामतींचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात ज्यात लोकांना असे जीवघेणे स्टंट्स करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येते.
Bro in danger ❌ Bro is danger ✅ pic.twitter.com/nyyWn81hr4
— Ankit (@terakyalenadena) December 31, 2024
अर्ररररर! गर्लफ्रेंडला करायला गेला इम्प्रेस, सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला; मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद
तरुणाची ही थरारक स्टंटबाजी @terakyalenadena नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाऊ धोक्यात नाही तर भाऊ स्वतःच एक धोका आहे’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या स्टंटवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ते एडिटेड आहे, आशा आहे की हे खोटे असावे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो यात तरबेज दिसत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.