PHOTO GENERATE AI
मुंबईच्या जुहू परिसरात एका बीएमडब्ल्यू कार चालक महिलाने अनेक वाहनांना धडक दिली, कार थांबवण्यास नकार दिला, यात वाहतूक पोलीस थोडक्यात बचावले आहेत. मुंबईच्या उच्चभ्रू जुहू परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक महिला आलिशान बीएमडब्ल्यू कार चालवत अनेक वाहनांना धडक देताना दिसत आहे. या घटनेचे चित्रीकरण चित्रीकरण करताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या महिलेने स्वताचं व्हिडिओ रेकॅार्ड करण्यास सुरूवात केली. आणि पोलीसांवर आरोप केले.
सीसीटीव्ही फुटेज नुसार एका बीएमडब्ल्यू कारने एका महिलेच्या स्कूटरला, सोबत एका मोटारसायकल आणि दुसऱ्या कारला धडक दिली आहे. यात ही महिला न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करते.
Road Accident in Juhu Mumbai! A woman is accused of hitting a scooter, a bike and a car yet instead of stopping she allegedly kept driving away She reportedly even tried to run her vehicle into police personnel When a female police officer who was recording the incident opened the rear door of the car and asked her to stop the vehicle the woman allegedly started recording a video herself and instead began making counter allegations against the police Why such behaviour towards the very police officers responsible for enforcing the law? There should be a fair investigation and strict action should be taken if the allegations are proven — Sahil chabra (@sahii199) October 30, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी महिला कार चालकाला इशारा देऊन आणि गाडीसमोर उभे राहून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि गाडी चालवण्याचे सुरूच ठेवले. गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या दिशेने ती पुढे गेली, ज्यामुळे त्या पोलिसाचा जीव धोक्यात आला असता.
अखेर आजूबाजूच्या लोकांनी कार थांबवली आणि त्या कारचा दरवाजे उघडला. मात्र, सहकार्य करण्याऐवजी, ती महिला घटनास्थळी जमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि लोकांचे चित्रीकरण करायला लागली. तिने त्यांच्यावर छळाचा आरोप करत “ते आमचा असा छळ करतात,” असे व्हिडिओत म्हणली. या घटनेमुळे रस्ते सुरक्षा, उत्तरदायित्व आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या वाहनचालकांच्या वर्तनाबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो.
Ans: मुंबईतील जुहू परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
Ans: BMW कारने एका स्कूटरसह मोटारसायकल आणि अन्य कारला धडक दिल्याचा आरोप आहे.
Ans: कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे चालक महिलेने दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.






