(फोटो सौजन्य: Instagram)
मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज शेकडो व्हिडिओज व्हायरल होत असतात. अशात अलिकडे एक रंजक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मुंबईचे काही रिक्षाचालक आपली ड्युटी संपवून रस्त्यांवर भोजपूरी गाण्यावर डान्स करताना दिसून आले. आयुष्यात कितीही तणाव असला, दु:ख असले तरी वाईट परिस्थितीही आपण जीवनाचा आनंद कसा लुटु शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमधून पाहायला मिळेल.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये काही रिक्षाचालक रस्त्यावर एकत्र जमल्याचे दिसते. रात्रीची वेळ आणि रस्त्यावर फार वर्दळ नसल्याने ते आपला ताण विसरुन जाण्यासाठी डान्स करण्याचा निर्णय घेतात. भोजपूरी गाणे वाजवले जाते आणि गाण्याच्या तालावर ते धम्माल मस्ती करत, हसत-खेळत आपली कंबर थिरकवताना दिसतात. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. आयुष्यातील सर्व चिंता विसरुन थोडा स्वत:साठी वेळ काढून ते नाचतात आणि कामाचा सर्व शीण दूर करतात. कधीकधी लहान गोष्टींमधूनही आपल्याला किती मोठा आनंद मिळू शकतो याची शिकवण आपल्याला या व्हिडिओतून मिळते. सोशल मिडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून लोक रिक्षाचालकांच्या या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @morashid.shah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या मोरांच्या या मुंबई भेटीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “काम तर होत राहिल आनंद महत्त्वाचा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काहीही म्हणा, आनंदच सर्वकाही आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पाहूनच मजा आली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






