हत्ती हा जगातील अतिशय विशाल प्राणी आहे. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावासाठी तो ओळखला जातो. तो कोणाला विनाकारण त्रास देत नाही मात्र एकदा का तो पिसाळला की संपूर्ण सृष्टी हलवून टाकतो. त्याचा रुद्रावतार पाहून भल्याभल्यांची हवा टाइट होते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक पिसाळलेला हत्ती चालू रस्त्यात धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. यात काढी तो कारला उचलून फेकतो तर कधी बसवर हल्ला करतो. हे सर्व दृश्य पाहून जवळील लोकदेखील आवाक् होऊन जातात. हा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्सचा थरकाप उडाला आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना बिहारमधील सारणा जिल्ह्यात दसऱ्याच्या मिरवणुकीदरम्यान घडली आहे. माहितीनुसार, दसरा मिरवणुकीत सामील होण्यासाठी एक हत्ती छपरा येथील सारणा जिल्ह्यामधल्या एकमा येथे आणला गेला होता. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्तीने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भररस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांचे तो नुकसान करू लागला. हत्तीची अशी दहशत पाहून तेथील सर्वजण घाबरून त्याच्यापासून दूर पळू लागले. अनेकांनी ही घटना आपल्या कॅमेरात कैददेखील केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ
व्हायरल व्हिडिओत चालू रस्त्याचे दृश्य दिसत आहे. ज्यात हत्ती गाड्यांची नासधूस करताना दिसून येत आहेत. तसेच यात अनेक लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सर्व प्रकार पाहतानाही दिसून येत आहे. हा पिसाळलेला हत्ती यावेळी एका कारला आपल्या सोंडेने हवेत उचलतो आणि दुसऱ्या जागी फेकतो. यावेळी हत्तीने कारचा अक्षरशः चक्काचूर केला. कारमधील लोक कसेबसे यातून बाहेर निघाली. यानंतर तो जवळील बसवर देखील हल्ला करतो. काही वेळच्या संघर्षानंतर हत्तीचा मालक त्यावर नियंत्रण मिळवतो आणि त्याला दुसऱ्या दिशेने घेऊन जातो.
हेदेखील वाचा – विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर धावू लागली, लोकांचा उडाला थरकाप, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @mantu.mobile नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मी कार घ्यायचा विचार करत होतो, आता आम्हाला हत्ती विकत घ्यावा लागेल असे दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो फक्त त्याची ताकद तपासत आहे की तो किती उचलू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यामुळेच प्राण्यांना कधीही त्रास नाही दिला पाहिजे”.