Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

Plane Hit Paraglider : एक धडक अन् आकाशातच जीवावर बेतला धोका...! आकाशात पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असतानाच महिलेच्या पॅराशूटला विमान येऊन धडकले ज्यानंतर व्हिडिओत जे घडले ते थरारक होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 10:23 AM
हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आकाशात सुरू असलेला साहसी खेळ काही सेकंदांत भीषण अपघातात बदलला.
  • हवेतच नियंत्रण सुटल्याने महिलेची स्वतःला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली.
  • प्रसंगावधान राखत केलेल्या एका निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली.
अनेक मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतानाच आता मात्र सोशल मिडियावर एक चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. घटना ऑस्ट्रियामध्ये घडल्याची माहिती असून यात एका महिलेसोबत गंभीर अपघात घडून आल्याचे दिसून आले. अपघात काही सांगून येत नाही आणि तो कधी कसा घडून येईल ते सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना महिलेसोबत आकाशात पॅराग्लायडिंग करताना घडली.

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

घडलं असं की, महिला खुल्या आकाशात पॅराशूटच्या मदतीने पॅराग्लायडिंगचा आनंद लुटत होती पण याचदरम्यान एक विमान महिलेच्या पॅराशूटला येऊन धडकले. विमानाला तर काही झाले नाही पण या धडकेमुळे महिलेचे पॅराशूट फाटले ज्यामुळे हवेतच तिचा तोल ढासळू लागला. यानंतर महिला घाबरली आणि आकाशातच आपल्या बचावासाठी तिची धडपड सुरु झाली. ही संपूर्ण घटना आता कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?

ही थरारक घटना ऑस्ट्रियातील श्मिटेनहोहे पर्वताजवळ घडून आल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, ४४ वर्षांची पॅरोग्लायडर सबरीना शनिवारी दुपारच्या सुमारास आकाशात पॅराग्लायडिंगचा आनंद लुटत होती. सर्वकाही सामान्यपणे सुरु होते पण काही क्षणातच परिस्थितीने भीषण रुप घेतले. अवघ्या काही सेकंदातच तिथून एक वेगवान विमान सबरीनाच्या पॅराशूटला धडकून पुढे गेला ज्यानंतर तिचे पॅराशूट फाटले आणि तोल ढासळल्याने ती जमिनीच्या दिशेने खाली पडू लागली.

व्हिडिओमध्ये सबरीना खाली पडत असताना स्वतःला वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसते. खाली पडत असतानाही ती शांतपणे परिस्थिती हाताळते आणि वेळीच इमरजंसी पॅराशूट खोलते ज्यामुळे तिचा जीव वाचतो. घटना भीषण होती पण सबरीनीच्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचवला. या घटनेमुळे सबरीनाला काही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर सबरीनाने इंस्टाग्रामवर सांगितले की, “मी जिवंत आहे आणि इथे बसून हे सगळं लिहित आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये”.

🚨 WATCH: A paraglider gets hit by a Cessna 172 near the Austrian town of Zell am See. The paraglider was able to pull her rescue parachute and land safely shortly after the incident on Saturday. According to police, the 44-year-old Austrian had started from Schmittenhöhe in… pic.twitter.com/HYQ7euRu57 — Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) May 24, 2026

Petrol Diesel Memes : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

रिपोर्टनुसार, सबरीना आकाशातून खाली पडल्यानंतर काहीवेळातच तिला पोलिस हेलिकाॅप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि यानंतर तिच्यावर उपचारही करण्यात आले. दुसरीकडे सबरीनाच्या पॅराशूटला धडकल्यानंतर विमान देखील सुरक्षितपणे लँडींग करण्यास यशस्वी झाले. विमानाचे थोडे नुकसान झाले पण कोणतीही जिवितहानी यात घडली नाही. पायलटच्या म्हणण्यानुसार, पॅराग्लायडर अचानक त्याच्या समोर आली ज्यामुळे त्याला टक्कर टाळता आली नाही. या घटनेचा व्हिडिओ @aviationbrk नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Paragliding accident in austria woman survives after mid air plane collision viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
1

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
2

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
4

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.