एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतबाबत (Entertainment Queen Rakhi Sawant) एक मोठी बातमी (Big News) समोर आली आहे. राखीने तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत (Boyfriend Adil Durrani) दुसरे लग्न (Second Merriage) केले आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर राखीने आदिलसोबत कोर्ट मॅरेज (Court Merriage) केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photos Viral On Social Media) होत आहेत.
आदिलला डेट केल्यानंतर राखी सावंतने त्याला आपला जीवनसाथी म्हणून निवडलं आहे. लग्नाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये राखी आणि आदिल लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात राखी आणि आदिल हातात लग्नाचे प्रमाणपत्र धरलेले दिसत आहेत. राखीच्या अचानक लग्नाचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राखीचं खरंच आदिलसोबत लग्न झालंय का, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राखी सावंत आणि आदिल त्यांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. राखीने प्रिंटेड शरारा सूट घातला आहे. डोक्यावर स्कार्फ बांधलेली राखी सावंत तिचे लग्नाचे प्रमाणपत्र दाखवत आहे. आदिलनेही राखीसोबत पोज दिली आहे.
[read_also content=”अहो आश्चर्यम! रस्त्यावर बाईक पार्क करणाऱ्याची हत्तीने चांगलीच जिरवली, धावत येत सोंडेनेच बाईक अशी उडवली की, व्हिडिओ होतोय व्हायरल https://www.navarashtra.com/viral/amazing-the-elephant-came-running-and-threw-the-bike-parking-middle-on-road-just-like-that-the-video-went-viral-nrvb-360981.html”]
राखीच्या लग्नाचे फोटो पाहून लोकही हैराण झाले आहेत, कारण राखीची आई हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी लढत आहे. कर्करोगानंतर तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले आहे. आईच्या आजारपणातच राखीने लग्न केल्याची चर्चा लोकांच्या कानावर येताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
अशा परिस्थितीत आता राखीने आदिल आणि तिच्या लग्नाचे वास्तव जगासमोर सांगितले आहे. तिच्या लग्नाबद्दल बोलताना राखी म्हणाली- माझे लग्न होऊन ७ महिने झाले आहेत. आदिलने मला ते लपवायला सांगितले होते. माझे कोर्ट मॅरेज झाले आहे. लग्न ठरले आहे. मी आता सांगत आहे, कारण ते सांगणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात काही चांगलं होतानाच दिसत नाही.
राखी सावंतचे आदिलसोबतचे हे दुसरे लग्न आहे. अभिनेत्रीने प्रथम बिझनेसमन रितेशशी लग्न केले. राखी रितेशसोबत बिग बॉसमध्येही दिसली होती, पण त्यांचे नाते काही टिकले नाही. अशा परिस्थितीत रितेश आणि राखीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
पहिला पती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिलने राखीच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा आणला. राखीने आदिलबद्दलच्या तिच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. राखी आणि आदिल उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. राखीने अनेकवेळा सांगितले की ती आदिलवर खूप प्रेम करते आणि आता तिने आदिलशी लग्न करून त्याची कायमचा जीवनसाथी म्हणून त्याच्याशी लग्नगाठ बांधली. आदिलसोबत तिने तिच्या नवीन आयुष्याची आनंदाने सुरुवात केली आहे. राखी आणि आदिलचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.