(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, वाघांच्या कुंपणाभोवती लोक जमलेले आणि वरून हे दृश्य पाहत असल्याचे दिसून येते. दरम्यान, एक माणूस अचानक एक बकरी उचलतो आणि न डगमगता ती वाघांच्या कुंपणात फेकतो. बकरी पडताच, तिथे उपस्थित असलेले सर्व वाघ एकाच वेळी तिच्यावर झडप घालतात आणि काही सेकंदातच तिला चावून खातात. हे दृश्य इतके थरारक असते की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. माणूस आधिपासून आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांचा वापर करत आहे आणि याचेच जिवंत उदाहरण पुन्हा एकदा या व्हिडिओत पाहायला मिळाले. व्हिडिओमध्ये १५ वाघांविरुद्ध बकरीला आपला जीव वाचवण्यासाठी कोणती संधीच मिळाली नाही कारण खाली पडताच सर्व वाघांनी घेरतच तिच्यावर हल्ला केला.
चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video
दरम्यान हा व्हिडिओ @thebrutal_nature नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कुठे आहे माणुसकी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नैसर्गिक असणे ही देवाची इच्छा आहे, पण आपण हे अजिबात करू नये…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वाईट गोष्टी नेहमीच कमकुवत लोकांसोबत घडतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






