(फोटो सौजन्य: X)
चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video
अॅलेक्स हा एक गिर्यारोहक असून तो सामान्यतः पर्वत आणि खडकांवर चढाई करतो. त्याने ५०८ मीटर उंचीच्या इमारतीवरून चढाई सुरु केली. अरुंद एल-आकाराच्या बाहेरील बाजू आणि पाय ठेवण्यासाठी शोभिवंत कडांवर अवलंबून राहून दुर्गम जंगलात त्याच्या नेहमीच्या चढाईंपेक्षा, ही चढाई एका गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी पार पडली. हळूहळू वर जाताना टाळ्यांचा गडगडाट व्हिडिओत स्पष्ट ऐकायला येत होता.
awesome! Taipei 101 pic.twitter.com/hOXgQnriMb — Otto Huang (@OttoHuang120) January 25, 2026
तैपेई १०१ ची रचनाच ती आव्हानात्मक बनवते. ही इमारत बांबूसारख्या कप्प्यांपासून बनलेली आहे, ज्याचा पृष्ठभाग निसरडा आणि उंच आहे. प्रत्येक विभागात आठ मजले आहेत. जोरदार वारे आणि उंचीमध्ये संतुलन राखणे ही अंतिम परीक्षा होती. पावसामुळे चढाई एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर ती नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपित करण्यात आली. लाल रंगाचा टीशर्ट घालून अॅलेक्सने शिखरावर पोहचताच हात हलवून आनंद साजरा केला. तो म्हणाला की, इमरतीच्या शिखरावरून तैपेई शहर एका स्वप्नासारखे दिसत होते. जोरदार वारे असूनही, तो त्याच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक होता. मुख्य म्हणजे इमारतीची ही धोकादायक चढाई त्याने कोणत्याही सुरक्षा हार्नेसशिवाय एकट्याने पूर्ण केली. त्याची एक चूक त्याचा जीव घेऊ शकली असती पण सुदैवाने आपल्या या स्टंटमध्ये तो यशस्वी झाला आणि त्याने संपूर्ण जगाला थक्क करून सोडले. अॅलेक्सने सांगितले की हार्नेसशिवाय त्याची ही पहिलीच चढाई होती.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






