(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, तरुण शांतपणे रस्त्याच्या बाजूने चालत असतो. परंतु याचवेळी काही भटके कुत्रे त्याच्यावर हल्ला चढवतात, ते तरुणाच्या मागे धावू लागतात. परिणामी रस्त्यावरील गाड्या न तपासता तरुण सुस्साट रस्त्यावर धावू लागतो आणि याचवेळी समोरुन येणारी एक वेगवान गाडी त्याला वाईटरित्या चिरडते. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. गाडीची धडक इतकी जबरदस्त असते की तरुण रस्त्यावरच बेशुद्ध पडतो.
अपघातानंतर रस्त्यावरील काही वाटसरु तुरुणीच्या मदतीसाठी धाव घेतात आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती सध्या नाजूक असून डाॅक्टरांद्वारे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आशा आहे की तो लवकर बरा होईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या सगळ्या कुत्र्यांना ठार मारा” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यात त्या वाहनाचा दोष नाही”.
A young boy was critically injured after being hit by a speeding vehicle while fleeing from a pack of stray dogs in the Kralpora area of Srinagar. The incident, captured on CCTV, shows the boy running onto the road in an attempt to escape the dogs before being struck by a… pic.twitter.com/70QEbWiK4L — Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 12, 2026
दरम्यान करालापोरा परिसरात घडलेली ही पहिलीच घटना नाही. स्थानिकांच्या मते, या भटक्या कुत्र्यांमुळे, लहान मुलांना आणि वृद्धांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये संताप उफाळून आला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करुनही प्रशासन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस पाऊले उचलत नाहीये. सध्या पोलिस आणि संबंधित अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. प्रशासनाने हा इशारा गांभीर्याने घेऊन सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कारवाई केली पाहिजे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






