Stunt Video : धाडस की मुर्खपणा? क्षणिक प्रसिद्धीसाठी तरुणाचा धोकादायक स्टंट; धावत्या ट्रेनला उलटा लटकला अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता क, एक ट्रेन अत्यंत वेगाने धावत आहे. याच वेळी एक तरुण ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून उलटा लटकतो. जवळपास ११ सेंकद तो तसाच उलटा लटकून राहतो. हा क्षण पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. चुकूनही तरुणाचा हात सटकला तर मोठी गंभीर दुर्घटना होऊ शकते. मात्र, तरुणाला याचे कसलेही भान राहिलेले नाही. याचा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला आहे.
हे राम.. इन जैसों से सृष्टि की रक्षा करो….
प्रभु 🙏
🤯 pic.twitter.com/0Gt6MnwKpe — Dinesh (@dkjain1308) June 16, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dkjain1308 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये ‘हे राम, इन जैसों से सृष्टि की रक्षा करो प्रभु’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिलया आहेत. यावर एका नेटकऱ्याने अशा लोकांना वाचवायची काही गरज नाही देवा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अलीकड्या तरुणाईला व्हायरल होण्याचे वेड लागले आहे, लाईक्ससाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे देखील स्पष्ट होते असे म्हटले आहे. गेल्या काही काळाता अशा स्टंटबाजीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. पण कोणी सुधार्या
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






