(फोटो सौजन्य: Instagram
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक जटाधारी, चेहऱ्यावर भस्म लावलेला वयस्कर बाबाजी रस्त्यावरुन भरधाव वेगात बाईक चालवत आहेत. त्यांनी केशरी रंगाचे कपडे परिधान केलेले असतात आणि त्यांचा चेहरा एकदम स्तब्ध असतो. व्हिडिओमध्ये सर्वात खास गोष्ट दिसते ती म्हणजे बाबाजींचा रुबाब. त्यांचा रुबाब इतका जबरदस्त असतो की पाहणारे त्यांच्याकडे पाहतच राहतात. आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे ते बाईक हाताने नाही तर आपल्या पायांनी चालवत असतात. बाबजींची ही अनोखी बाईक सवारी पाहून रस्त्यावरचे इतर प्रवासीही हैराण होतात आणि लगेच हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु लागतात. यातीलच एकाने सोशल मिडियावर बाबाजींचा हा व्हिडिओ शेअर केला. लोक ही अनोखी बाईक रायडिंग पाहून अवाक् झाले असून अनेकांनी बाबाजींच्या या स्टंटचे भरभरुन काैतुक केले आहे.
View this post on Instagram
पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ
हा व्हिडिओ @bittu_22k नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “बाबाजी राॅक, लोक शाॅक. लाईक्सच्या हव्यासापोटी लोक माणुसकी विसरले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त महादेवाचे भक्तच असा जलवा दाखवू शकतात” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बाबाजी यमराजांचे लहान भाऊ तर नाही?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






