Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट

Viral Video : हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनीने हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाच्या पंखावर ‘विंगवॉकिंग’ स्टंट करत चाहत्यांना थक्क केले आहे. सेफ्टी हार्नेसच्या मदतीने बायप्लेनच्या पंखावर असताना विमान हवेत उलटे झाल्यानंतरही ती हसताना आणि 360-डिग्री कॅमेऱ्याने क्षण टिपताना दिसते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2026 | 04:47 PM
हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट

हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट

Follow Us
Follow Us:
  • Sydney Sweeney चा धाडसी Wingwalking Video व्हायरल
  • विमानाच्या पंखावर उभी राहून Sydney Sweeney ने केला जीवघेणा स्टंट
  • Tom Cruise ला थेट चॅलेंज!
 

Viral Video : हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनीने आपल्या अभिनयासोबतच आता धाडसी अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाच्या पंखावर उभे राहून तिने ‘विंगवॉकिंग’ स्टंट केला. या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करताना सिडनीने हॉलिवूडमधील धाडसी स्टंटसाठी प्रसिद्ध असलेल्या टॉम क्रूजचाही उल्लेख केला.

विमानाच्या पंखावर सिडनी स्वीनी

व्हिडिओमध्ये सिडनी एका बायप्लेनच्या वरच्या पंखावर असल्याचे दिसते. सुरक्षेसाठी तिला सेफ्टी हार्नेसच्या सहाय्याने विमानाला बांधण्यात आले आहे. उंची आणि हवेचा प्रचंड वेग असतानाही तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा उत्साह दिसून येतो. तिने या संपूर्ण अनुभवाचे दृश्य 360-डिग्री कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले आहे. त्यामुळे विमानाच्या पंखावरून दिसणारा परिसर आणि स्टंटचा थरार व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो.

Nepal Flash Flood: बस-कार खेळण्यांसारख्या वाहून गेल्या, इमारतही क्षणात उद्ध्वस्त; नेपाळच्या पुरातील Viral Video कुठला?

विमान उलटं झालं अन्…

स्टंटचा सर्वाधिक थरारक क्षण विमान हवेत उलटे झाल्यानंतर पाहायला मिळतो. सिडनी विमानाच्या पंखावर सेफ्टी हार्नेसने बांधलेली असतानाच बायप्लेन हवेत फिरते. या क्षणीही सिडनी शांत आणि हसतमुख दिसते. विमानाची हालचाल सुरू असतानाही ती कॅमेऱ्याकडे पाहताना आणि आजूबाजूचा नजारा अनुभवताना दिसते.

‘Watch Out Tom Cruise’

सिडनीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत Instagram अकाउंटवर शेअर करताना ‘Watch Out Tom Cruise’ असे लिहिले. तिच्या या मजेशीर प्रतिक्रियेमुळे व्हिडिओची आणखी चर्चा झाली. टॉम क्रूज हा स्वतः अनेक धोकादायक स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः ‘Mission: Impossible’ चित्रपट मालिकेतील त्याचे विमान आणि हवेत केलेले अनेक स्टंट जगभरात चर्चेत आले आहेत. त्यामुळे सिडनीची ही प्रतिक्रिया टॉम क्रूजच्या स्टंट्सकडे केलेला मजेशीर इशारा मानली जात आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा

सिडनीचा विंगवॉकिंग स्टंट पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले असून तिला भविष्यात एखाद्या मोठ्या ॲक्शन चित्रपटात पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी तर सिडनीला आगामी ॲक्शन किंवा ‘Mission: Impossible’सारख्या चित्रपटात संधी मिळायला हवी, अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Wingwalking म्हणजे काय?

‘विंगवॉकिंग’ हा विमानाशी संबंधित अत्यंत जोखमीचा एरियल स्टंट आहे. यामध्ये व्यक्ती विशेष सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने विमानाच्या पंखावर निश्चित केलेल्या जागी राहते. विमान हवेत असताना विविध हालचाली करत असल्यामुळे या स्टंटसाठी प्रशिक्षित पायलट, सुरक्षा उपकरणे आणि तज्ज्ञांची देखरेख अत्यंत महत्त्वाची असते.

सिडनी स्वीनीच्या या स्टंटने तिच्या चाहत्यांना तिचा वेगळाच धाडसी अंदाज पाहायला मिळाला आहे. त्यात ‘Watch Out Tom Cruise’ या कॅप्शनने आणखी रंग भरल्याने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Web Title: Sydney sweeney wing walking stunt 10000 feet challenges tom cruise viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Hollywood
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
1

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
2

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
3

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
4

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.