अफवांमुळे पेट्रोल पंपावर तुफान गर्दी झाली असून ड्रम्प भरुन लोक पेट्रोल नेत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Petrol Pump Viral Video : मुंबई : आखाती देशांमध्ये सुरु युद्धाचा परिणाम भारतावर दिसून आला आहे. भारतामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. एलपीजी गॅस (LPG Gas) मिळत नसल्यामुळे सामान्य लोक मेटाकुटीला आले आहेत. तसेच आता पेट्रोलवरुन देखील जनसामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोल संपल्याच्या पाट्या देखील लागल्या आहेत. पेट्रोल पंपावरील या गर्दीचे फोटो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अफवांमुळे घबराट पसरली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर लोकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहक इंधन भरण्यासाठी कॅन आणि मोठ्या टाक्या आणि बाटल्या घेऊन येत आहेत.
हे देखील वाचा : अयोध्येत प्रभू श्री रामांना सूर्यतिलक; तेजस्वी प्रकाशाने उजळले रामांचे मनमोहक रुप
मिळालेल्या वृत्तांनुसार, मध्य-पूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतुकीत झालेल्या व्यत्ययाच्या वृत्तांमुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. गॅसनंतर आता पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा निर्माण झाला असल्याची अफवा पसरली आहे. यामुळे पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली भागातील एका पेट्रोल पंपावर एकजण तब्बल २०० लिटरची टाकी घेऊन आला. पाण्यासाठी असलेल्या टाकीमध्ये पूर्णपणे पेट्रोल भरताना दिसून आला. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये इंधन भरण्यासाठी अनेक लोक लांब रांगांमध्ये उभे असलेले दिसले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील पंपांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
#Buldhana | बुलढाण्यात इंधनाच्या तुटवड्याच्या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली. मात्र, जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केलं. #FuelUpdate #PetrolDiesel #NoFuelShortage pic.twitter.com/zDq0879XNU — AIR News Pune, आकाशवाणी पुणे (@airnews_pune) March 27, 2026
“नो स्टॉक” असे पेट्रोल पंपावर फलक
अफवांमुळे पेट्रोलच्या वाढत्या मागणीमुळे अनेक पेट्रोल पंपांवरील इंधनही संपले आहेत. ज्यामुळे अनेक पंपांवर “स्टॉक नाही” असे फलक लावण्यात आले. पेट्रोल पंप बंद झाल्यामुळे लोकांची चिंता आणखी वाढली.
हे देखील वाचा : देशात इंधनाचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका! पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की देशाकडे पुरेसा इंधनसाठा असून कोणताही तुटवडा नाही. असे असूनही, अफवांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे असे सरकारकडून सांगण्यात आले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने इंधन वितरणावर मर्यादा घातल्या आहेत. आता चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त २,००० रुपयांचे पेट्रोल आणि दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे पेट्रोल पुरवले जात आहे.
महाराष्ट्र के बुलढाणा में ग्राहक डब्बे और टंकियां लेकर पेट्रोल पंप पहुंचे…
ऐसा लग रहा है कि जैसे तेल नहीं पानी लेने गए हों…#buldhana #petrol #viralvideo #maharashtra pic.twitter.com/RBMXGwveNN — Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) March 27, 2026
अफवांकडे दुर्लक्ष करून अनावश्यकपणे इंधनाचा साठा करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.






