सिंह हा एक असा प्राणी आहे, ज्याला पाहून फक्त प्राणीच नाही तर माणसंही दूर पळू लागतात. तो त्याच्या विशाल ताकदीसाठी आणि थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हणूनही संबोधले जाते. एकदा का सिंहाची नजर कोणत्या प्राण्यावर पडली तर मग त्याचे सिंहाच्या तावडीतून निसटणे कठीण होऊन बसते. सिंहाच्या शिकारीचे बरेच व्हिडीओज आजवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडतो मात्र यावेळी सोशल मीडियावर एक भलताच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंह कोणत्या प्राण्याची नाही तर सिंहाचीच शिकार केल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्यास पुरेशी आहेत. यात एक गरुड चक्क जिवंत सिंहाला हवेत उचलताना दिसून येत आहे. सिंहासारख्या खतरनाक प्राण्याला एका पक्षाने असे मात देणे काही सामान्य गोष्ट नाही. ज्याला पाहून मोठमोठे प्राणी थरथर कापू लागतात त्याला एका पक्षाने हवेत झेलणे आणि त्याची शिकार करणे अनेकांना अचंबित करत आहे.
जसे प्राण्यांमध्ये सिंह आपल्या शिकारीसाठी प्रचलित आहे तसेच पक्षांमध्ये गरुड हा आपल्या शिकारीसाठी ओळखला जातो. गरुडाचीही नजर एखाद्या जीवावर पडली तर तो सहजासहजी कोणाला सोडत नाही. एका झटक्यात हवेत उचलून तो आपल्या शिकाऱ्याला मात देतो. गरुडाचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र सध्याचा व्हिडिओ सर्वांनाच हैराण करत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात भर अवकाशात हजारो फुटांच्या वर गरुडाची तीव्र झेप दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या हातात त्याची शिकार असते. ही शिकार दुसरी दुसरी कोणी नसून जंगलाचा राजा म्हणजेच सिंह असतो. अखेर अवकाशातील शिकाऱ्यासमोर जमिनीवरील शिकाऱ्याची हार झाल्याचे दिसून येते जे पाहून सर्वच हैराण होतात. गरुडाची ताकद सिंहासमोर कमी पडते. व्हिडिओत सिंह हतबल होऊन हवेत तरंगताना दिसून येतो. सिंहाची ही अशी हार अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @heavenly_nature_1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘गरुड सिंहासह उडत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील धक्कादायक दृश्यांवर आणि सिंहाच्या या शिकारीवर अनेकांना कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सिंह किती जड असतो माहीत आहे का?? ज्यांना हे खरे वाटते त्यांच्यासाठी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी AI चा तिरस्कार करू लागलो आहे”. खरंतर हा एक AI जेनेरेटेड व्हिडिओ आहे, कारण कोणत्याही पक्ष्याला इतका मोठा प्राणी हवेत झेलणे जमू शकत नाही, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केला गेला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.