सौजन्य - सोशल मिडीया
आजकाल जगभरात विचित्र घटना घडत आहेत. वाढत्या तंत्रज्ञानामुळे देशाची प्रगती होत आहे. पण तितक्याच समस्याही वाढत आहेत. मोठ्या शहरांमध्ये तर राहण्यासाठी विविध आव्हानांना रोज सामोरे जावे लागते. ट्रॅफिकची समस्या खुप वाढली आहे. अशा वेळी मनात विचार येतो की, आपल्याला पंख असते तर ट्रॅफिकची समस्याच उदभवली नसती. मात्र, हे फक्त काल्पनिक गोष्टीं मध्येच शक्य आहे. तसे खऱ्या जीवनात आपण हेलिकॉप्टर, विमान वापरू शकतो. पण हे फक्त प्रचंड पैसे असतील तरचं आपल्याला वाटेल तेव्हा आपण करू शकतो.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीनं शहरातील ट्रॅफिकवर मात करण्यासाठी असं काही केलं की, याचा विचारही करू शकत नाही. न्यूयॉर्कमध्येही अशीच वाहतूक रहदारीची समस्या आहे. या ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय रहीवासीने हेलिकॉप्टर बूक केले. तिने उबर न करता चक्क हेलिकॉप्टर बुक केले. बुकिंगचा एक स्क्रीनशॉटही तिने सोशल मिडीयावर शेअर केला. खुशी सुरी असे या महिलेचे नाव आहे. कॅबच्या प्रवासापेक्षा हेलिकॉप्टरचा प्रवास स्वस्त आणि सोपे असल्याचे खुशी सुरीने म्हटले आहे. अमेरिकेत कॅबप्रमाणेच एक हेलिकॉप्टर सेवा देखील आहे, ज्याचे नाव ब्लेड आहे.
60 min uber or 5 min helicopter ride – literally a $30 difference @flybladenow pic.twitter.com/wOZyOjjR9w
— khushi (@khushkhushkhush) June 16, 2024
या महिलेच्या स्क्रीनशॉटनुसार, उबर राइडची भाडे अंदाजे रु. 11,000 दाखवत होते. पण ब्लेड वर US$ 165 मणजे रु. 13,765 च्या भाड्याने 5 मिनिटांत पोहोचवत होते, आणि फक्त २००० रुपयांचा $30 चा फरक पडत होता. तिची ही पोस्ट वाचून तिचे कौतुक केले जात आहे. तिचे ट्विटही व्हायरल झाले आहे. तसेच नेटकऱ्यांनी पोस्टवर कंमेटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ”हे खरं आहे का? मलाही हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आहे.” तर ‘बस्स! एवढं श्रीमंत व्हायचंय” असं एकाने म्हंटले आहे. तर अनेकांनी तिच्या निर्णयाचं कौतुक केलंय.