आजकाल स्मार्टफोनमध्ये खूप वेगवगळी फिचर्स येत असतात. वेगवेगळ्या आकाराचे मोबाईलही तुम्ही बघितले असतील. मात्र आज आपण ज्या स्मार्टफोनबद्दल बोलणार आहोत. तो एकदम हटके आहे. काचेसारखा पारदर्शक (Transparent Smartphone) आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेल्या एका स्मार्टफोनचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या स्मार्टफोनची सध्या खूप चर्चा सुरु आहे.
A transparent smart phone design pic.twitter.com/9iXstC7jXN — Vala Afshar (@ValaAfshar) August 5, 2022
वाला अफशरने ट्विटरवर एक १२ मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक खास स्मार्टफोन दाखवण्यात आला असून तो ऑपरेटही केला जात आहे. काचेसारखा पारदर्शक दिसणाऱ्या या स्मार्टफोनमधून आरपार देखील दिसू शकते. त्याचा इंटरफेस अँड्रॉइड ओएसवर काम करणारा आहे. रेडमीच्या इंटरफेससारखा तो दिसून येत आहे. मात्र हा स्मार्टफोन कोणत्या कंपनीचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
[read_also content=”या भेटीमागे दडलंय काय ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची भेट https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-eknath-shinde-meeting-with-vishwajeet-kadam-nrsr-315690/”]
आरशाप्रमाणे दिसणाऱ्या या फोनमध्ये प्रीमियम स्मार्टफोनचे फीचर्सही देण्यात आले आहेत. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सिस्टीम आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला स्मार्टफोनचा वायरलेस चार्जिंग पॅड देखील पारदर्शक असून त्याला काळ्या रंगाची केबल आहे.
हा पारदर्शक स्मार्टफोन केवळ व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला नाही, तर १२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोबाईलही ऑपरेट करण्यात आला आहे.






