काय घडलं नेमकं?
नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका तरुणीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे सुमारे २५ वर्ष वयोगटातील तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. प्राथमिक तपासात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतदेह शेजारी पिझ्झाचा बॉक्स
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना मृतदेहाजवळ पिझ्झाचा बॉक्स तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही आहे. ही हत्या घटनास्थळीच झाली की दुसऱ्या ठिकाणी करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने इथे आणून टाकण्यात आला. याचा देखील पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नाशिकमध्ये पत्नीबद्दल वाईट भावना ठेऊन अपशब्द वापरल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. इगतपुरी तालुक्यातील वाडीव येथील पिंपळगाव डुकरा शिवारातील गिऱ्हेवाडी येथे ही घटना घडली.
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारातील अनिल एकनाथ गिरे (रा. गिडेवाडी) याचा खून झाला असल्याची घटना शुक्रवार (दि. २०) उघडकीस आली. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडीराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
Ans: अद्याप ओळख पटलेली नाही.
Ans: धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.
Ans: तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तपास सुरू आहे.






