नवी दिल्ली : जगात एकापेक्षा एक नावाजलेल्या फूड कंपन्या (Well Known Food Companies) आहेत. ज्या अन्न सेवा (Food Services) देण्याचे काम करतात. कंपनी चांगल्या सुविधांसाठी खूप चांगली किंमत देखील आकारते (Charge More Price For Quality). अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कुठून तरी जेवणाची ऑर्डर (Meal Order) देता किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आलात, तेव्हा तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणाची अपेक्षा नसेल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका रेस्टॉरंटचे कृत्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरंच, अमेरिकेतील मॅनहॅटनमधील कोरियाटाउन रेस्टॉरंट गॅमिओकवर खटला दाखल करण्यात आला आहे. ज्यात दावा केला आहे की, त्याने दोन ग्राहकांना त्यांच्या सूपमध्ये मेलेला उंदीर दिला.
[read_also content=”माणुसकी अजूनही जिवंत आहे! अर्ध्या रात्री, सुनसान रस्ता आणि बाइकने दिला दगा, रस्त्यावर उभं होतं कुटुंब; पुढे जे झालं…झाला VIRAL VIDEO https://www.navarashtra.com/viral/deserted-road-and-bike-broken-at-midnight-family-on-the-road-what-happened-next-video-went-viral-humanity-is-still-alive-nrvb-377409.html”]
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये तुम्ही गोमांस, तांदूळ आणि भाज्यांच्या सूपच्या कंटेनरमध्ये मृत उंदीर असल्याचे दर्शविणारा व्हिडिओ पाहू शकता. तसेच महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “खूप घृणास्पद आहे. आमच्या सूपमध्ये एक मृत उंदीर आहे. आम्हाला उलट्या झाल्या.”
यावर गॅमिओक म्हणतो की, महिलेचा हा आरोप खोटा आहे. त्यांनी पैशांची मागणी केली आणि धमक्या दिल्या आणि आम्ही नकार दिल्यानंतर ते सोशल मीडियावरून आमच्यावर हल्ले करत आहेत. त्यामुळे आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत. विशेष म्हणजे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.