लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार
लहान मुलांची योग्य काळजी न घेतल्यास तरुण वयात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची असत शक्यता असते. पूर्वीच्या काळी थायरॉईड हा आजार फक्त महिलांमध्ये दिसून यायचा. पण हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा थायरॉईडची लक्षणे दिसून येत आहेत.थायरॉईड झाल्यानंतर अनेक बदल शरीरात दिसू लागतात. पण याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कालांतराने शरीरात थायरॉईडची लक्षणे वाढू लागतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. आजकाल थायरॉईडची समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित न राहता पुरुषांबरोबरच लहान मुलांमध्येही थायरॉईडचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता मुलांमध्ये ही हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड कमी तयार होणे आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड जास्त तयार होणे या दोन्ही स्थिती आढळतात.मुलांच्या थायरॉईड ग्रंथी प्रौढ थायरॉईड ग्रंथींपेक्षा किरणोत्सर्गास अधिक संवेदनशील असतात डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये थायरॉईड असल्यास कोणती लक्षणे दिसतात.(फोटो सौजन्य – istock)
मुलाचे वजन अचानक खूप वाढणे किंवा झपाट्याने कमी होणे हे थायरॉईडचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. त्यामुळे मुलांच्या वजनाकडे नियमितपणे लक्ष द्यावे.सतत सुस्तपणा किंवा चिडचिड मुले कायम थकलेली, आळशी किंवा कारण नसताना चिडचिडी वाटत असतील, तर हे खासकरून हायपोथायरॉइडिझमचे लक्षण असू शकते. थायरॉईडच्या असंतुलनामुळे शारीरिक वाढ मंदावते आणि वर्तनात बदल दिसू शकतात.
मुलांचे केस जास्त प्रमाणात गळणे, त्वचा खूप कोरडी होणे हेही थायरॉईडची चिन्हे असू शकतात.कोणत्याही वयात थायरॉईड होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. वजन वाढणे, सतत थकवा, त्वचा कोरडी होणे, थंडी वाजणे, केस गळणे, बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणे हायपोथायरॉईडीझम झाल्यानंतर दिसू लागतात.
थायरॉईड विकारांचे प्रमाण पुरुष व तरुणांमध्ये का वाढतेय? नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम
ही लक्षणे दीर्घकाळ दिसत राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.साध्या ब्लड टेस्टच्या माध्यमातून थायरॉईडची तपासणी करता येते.वेळेवर निदान आणि उपचार केल्यास मुलाचा शारीरिक व मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकतो. याशिवाय थायरॉइडची पातळी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करावेत.
Ans: हायपोथायरॉईडीझम, हायपरथायरॉईडीझम
Ans: यामध्ये प्रामुख्याने स्वयंप्रतिकार विकार (Autoimmune disorders) कारणीभूत असतात. हायपोसाठी 'हाशिमोटो रोग' (Hashimoto's) आणि हायपरसाठी 'ग्रेव्हज रोग' (Graves' disease) ही मुख्य कारणे आहेत.
Ans: थायरॉईड समस्या सहसा आजीवन असते, परंतु योग्य औषधे (उदा. थायरॉक्सिन गोळी), आहार आणि जीवनशैलीत बदल करून ती पूर्णपणे नियंत्रित केली जाऊ शकते.






