Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Grandma Viral Video : गोष्ट लहान असली तरी पहिल्यांदा तिला पाहतानाचा अनुभव काही वेगळाच असतो. आयुष्यात कधीही प्रत्यक्षात समुद्र न पाहणाऱ्या आज्जीने जेव्हा समुद्रकिनाऱ्याला भेट दिली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. व्हिडिओतील दृष्यांनी आता यूजर्सना भावूक केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 02:42 PM
आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आज्जींची अनेक वर्षांपासूनची एक छोटीशी इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • कुटुंबासोबत घालवलेला हा खास वेळ पाहून नेटकरी भावुक झाले असून अनेकांनी आपल्या ज्येष्ठांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
  • व्हिडिओने नातेसंबंध, कुटुंबाची साथ आणि आयुष्यातील छोट्या आनंदांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
बाईचा अख्खा जन्म चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. आताच्या काळात मुली मनसोक्तपणे आपल्याला हव्या त्या ठिकाणी फिरुन येऊ शकतात पण पूर्वी तसं नव्हतं. घराच्या चाैकडीतच महिला इतक्या रमायच्या की बाहेर जग त्यांनी माहितीच पडत नव्हतं किंबहुणा त्यांना दाखवलं गेलं नव्हतं. अलिकडेच सोशल मिडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एक कुटुंब समुद्रकिनारी निसर्गाचा आनंद लुटताना दिसून आलं.

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

कुटुंबासाठी हा खूप खास क्षण होता कारण यावेळी त्यांची आज्जी त्यांच्यासोबत बाहेर आली होती. ८७ वर्षांच्या आज्जीने आपले संपूर्ण आयुष्य घर सांभाळण्यात घालवले ज्यामुळे इतक्या वर्षातही तिने कधी समुद्र जवळून पाहिला नाही. कुटुंबाने जेव्हा आज्जीची ही इच्छा पूर्ण केली तेव्हा समुद्राला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज्जीच्या प्रतिक्रियेने अनेकांचे मन जिंकले असून आज्जीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय दिसलं?

व्हिडिओतील दृष्ये फक्त त्या आज्जीची नाही तर भारतीय घरातील अनेक महिलांची कथा व्यक्त करते ज्यांनी घराबाहेरचं आयुष्य फार पाहिलंच नाही. घराच्या चार भिंतीत आपल्या माणसांत त्या अडकून राहिल्या आणि जीवनाचा शेवट जवळ येताच त्यांना जाणवलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या. व्हायरल होत असलेल्या आज्जींची देखील अशीच कथा आहे. वयाच्या 87 आपल्या नातीशी बोलताना त्यांनी तिला सांगितलं की, त्यांनी तर कधी समुद्र प्रत्यक्षात पाहिलाच नाही. आपल्या आज्जीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी नातीने समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओत संपूर्ण कुटुंब समुद्रकिनाऱ्यावरील त्या कमी गर्दीचा, लाटांचा आणि त्या हवेशीर वातावरणाचा आनंद लुटताना दिसेल. लाटा पायांना स्पर्श करताच आज्जीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं जे व्हिडिओची हायलाईट ठरलं.

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

हा व्हिडिओ @hersheyy_vibes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘माझ्या आजीने ८७ वर्षे सर्वांची काळजी घेण्यात घालवली… पण तिला कधीच समुद्रकिनारा पाहता आला नाही. म्हणूनच आज, आम्ही ती गोष्ट बदलली. जर तुमची आजी-आजोबा अजूनही तुमच्यासोबत असतील… तर त्यांना बाहेर घेऊन जा. त्यांच्यासोबतच्या आठवणी खास बनवा’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “हे किती मनाला आनंद देणारं आहे!!! त्या गोड मुलीची इच्छा पूर्ण झाली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती छान आहेस तू; तू तुझ्या आजीला अतोनात आनंद दिलास… मला खूप गहिवरून आलं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यामुळे खरोखरच माझा दिवस बनला…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 87 year old grandmother sees sea for first time viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Family
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
1

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
2

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
3

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral
4

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.