'कच्ची कली' गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर असाच एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कच्ची कली गाण्यावर एका काकांनी असा जबरदस्त डान्स केला आहे लोक वन्स मोअरची हूटिंग करत आहेत. अनेजण काकांकडे पाहतच पाहिले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काका डझनभर पाहुण्यांच्या मध्ये स्टेजवर नाचतावा दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये कच्ची कली गाणे सुरु आहे. काकांनी या गाण्याचे हुक स्टेप इतक्या परफेक्ट केले आहे लोक पाहून जोरात हूटिंग करत आहेत. तसेच त्यांनी इतर लोकांना देखील डान्स करण्यासाठी मजबूर केले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @roopshrree._ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर काकांचे भरभरुन कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने सगळ्या मुली काकांच्या फॅन झाल्या असे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने काकांनी तर घायाळच केले असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने काका, तुम्हाला माझ्या लग्नाचे आमंत्रण आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असून तुफान वेगाने व्हायरस होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






