Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाची नशा की वेडेपणा… ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral

Birthday Celebration Viral : सेलिब्रेशनसाठी असा धोकादायक मार्ग निवडला की थेट मुंबई पोलिसांना तरुणावर करावी लागली कायदेशीर कारवाई. या अजब-गजब सेलिब्रेशनवर आता यूजर्सने जोरदार टिका केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 09:29 AM
वाढदिवसाची नशा की वेडेपणा... ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral

वाढदिवसाची नशा की वेडेपणा... ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवस साजरा करताना एका व्यक्तीने धोकादायक पद्धतीचा अवलंब केला.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
  • घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकरणाची दखल घेतली.
आपला वाढदिवस म्हटला की लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा जोश येतो. आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवसाचे सेलिब्रशन केले जाते. कुणी केक कापतं, कुणी पार्टी करतं तर कुणी सुंदर ठिकाणांना भेट देऊन आपल्या जन्माचा दिवस साजरा करतात. अलिकडे मात्र एका आगळ्यावेगळ्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणाने सेलिब्रेशनसाठी सर्व सीमा ओलांडल्याचे दिसून आले. वाढदिवसाला काहीतरी वेगळं करायचं या उद्देशाने व्यक्तीने रस्त्यावर पेट्रोल ओतलं आणि रस्त्याला आग लावत त्याचे हे धोकादायक सेलिब्रेशन पार पाडले.

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

तरुणाने या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला आणि नंतर सोशल मिडियावर याला सर्वांसोबत शेअर केले. पण नेहमी आपल्याला जसं वाटतं तसं घडत नाही तेच खरं. प्रसिद्धीसाठी तरुणाने केलेला हा अजब प्रकार त्याच्यावरच उलटला आणि व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सांगण्यात येत आहे की, या घटनेनंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तरुणीला लगेच अटक केली ज्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे.

नक्की काय घडलं?

मुंबईतील एका ३३ वर्षीय कार डीलरने आपला वाढदिवस धोकादायक पद्धतीने साजरा केला, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. गोरेगाव पश्चिम, जोगेश्वरी येथील या कार डीलरने, सनटेक सिटी फोर्थ अव्हेन्यू बाहेरील एमएमआरडीए रस्त्यावर पेट्रोल ओतून आणि आग लावून वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन शूट केले. या धोकादायक कृत्यामुळे रस्त्याचे चार ठिकाणी नुकसान झाले आणि पार्क केलेले वाहने देखील आगीच्या कचाड्यात अडकता अडकता राहिली. ही आग जास्त पसरली असती तर आजूबाजूच्या गाड्या जळून खाक होण्याची शक्यता होती. तरुणीच्या या धोकादाय सेलिब्रेशनने शेवटी त्यालाच अडचणीत आणले आणि मुंबई पोलिसांनी तातडीने व्यक्तीवर कायेदशीर कारवाई करण्यास सुरुवात केली. व्हिडिओत दिसते की, आपला ३३ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तरुणाने रस्त्यावर पेट्रोलने ३३ आकडा रेखाटला आणि मग त्याला आग लावली.

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

सदर घटनेचा व्हिडिओ @mo.of.everything नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला उलटा टांगून त्याच्या पाठीवर ३३ वेळा फटके मारा… तो अज्ञानी माणूस आपली जन्मतारीख विसरून जाईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानलं, पेट्रोल त्याचे असेल, पण रस्ता त्याचा नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बॉलीवूड इफेक्ट”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man sets road on fire to celebrate 33rd birthday viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Birthday
  • Fire
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
1

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
2

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
3

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
4

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.