Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

Red Sprites : काल्पनिक की सत्य! तिबेटच्या आकाशात चमकताना दिसले लाल रंगाचे अद्भूत खांब, पाहून यूजर्सना बसला धक्का. काहींनी निसर्गाचा चमत्कार म्हटलं तर काहींनी एलियन्सच्या वास्तवाचा पुरावा दिला, पण या गूढ दृष्यांमागचं रहस्य मात्र वेगळंच होतं. जाणून घ्या सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 02:26 PM
रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तिबेटच्या आकाशात दिसलेल्या एका दुर्मिळ आणि रहस्यमय प्रकाशमय दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
  • हा प्रकार काही क्षणांसाठीच दिसून येतो, त्यामुळे तो प्रत्यक्ष पाहणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या अनोख्या दृश्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
सोशल मडियावर कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे अनेक दुर्लभ आणि अतरंगी व्हिडिओज शेअर केले जातात. इथे बऱ्याचदा काही असे दृष्यही शेअर होतात ज्यांना आपण कधी आपल्या आयुष्यात पाहिलं नसेल. अलिकडे तिबेटमधील असेच एक अद्भूत दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडले. इथे निसर्गाने आपले अनोखे रुप दाखवले ज्यानंतर आकाशात लाल प्रकाशाचे काही गूढ स्तंभ चमकताना दिसले. हे दृष्य पाहणाऱ्या व्यक्तीने आपल्या कॅमेरात त्यांना कैद केले आणि इंटरनेटवर याचा व्हिडिओ शेअर केला. चला स्वप्नवत वाटणारे हे दृष्य खरे की खोटे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

दृष्यांमागचे सत्य काय?

व्हिडिओत दिसणारे दृष्य एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे दिसते. पण हे दृष्य खोटे नसून खरे आहे. याला ‘रेड स्प्राइट्स’ (Red Sprites) असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा फार दुर्मिळ विजेचा प्रकार आहे. ही वीज सामान्य वीजेहून फार वेगळी असते. सामान्यत: आपण जी वीज गडगडताना पाहतो ती ढगांमध्ये किंवा ढगांमधून जमिनीवर कोसळताना दिसते पण रेड स्प्राइट्स जमिनीपासून सुमारे ५० ते ९० किलोमीटर उंचीवर, म्हणजेच वरच्या वातावरणात कोसळते.

वैज्ञानिक भाषेत याला ट्रांजिएंट ल्यूमिनस इवेंट (TTE) असे म्हटले जाते. ही वीज जेव्हा कोसळताना दिसते तेव्हा ती आकाशात खांब, जेलीफिश, गाजर आणि झाडांसारखा आकार तयार करते. तिबेटमध्ये अलिकडे दिसणारे दृष्य देखील याचाच प्रकार आहे. तिबेटला जगाचे छत म्हणून ओळखले जाते. त्याची जास्त उंची, निरभ्र आकाश आणि अत्यंत कमी प्रकाश प्रदूषण यामुळे वरच्या वातावरणातील हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी येथील हवामान अगदी योग्य ठरते. हेच कारण आहे की रेड स्प्राइट्सचे अद्भूत दृष्य इथून लगेच दिसून आले.

😲 STUNNING: Extremely Rare Red Sprites Spotted Flashing Over Tibet They are caused by high levels of electrical activity and form in the upper atmosphere during powerful thunderstorms. pic.twitter.com/KDrTxCNw7K — RT_India (@RT_India_news) June 2, 2026

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

ही वीज ढगांंमध्ये अतिउंचीवर निर्माण होणारी एक दुर्मिळ आणि रहस्यमयी विद्युत घटना आहे. ही प्रकाशमय लाल रंगाची वीज फक्त काही मिलीसेकंदच आकाशात टिकून राहते ज्यामुळे मानवी डोळ्यांनी तिला पाहता येणे फार कठीण मानले जाते. अतिउंच पर्वतीय भागतून किंवा कॅमेरातून याला स्पष्टपणे कैद करता येऊ शकते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral tibet red sprites mysterious red light pillars seen in sky viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.