(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
बायकोने नवऱ्याला मारल्याचा हा व्हिडिओ खुद्द नवऱ्यानेच आपल्या फोनमध्ये शूट केल्याची माहिती आहे. पिडित पती बऱ्याच काळापासून पत्नीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळला होता. त्याने पोलिसांकडे याची तक्रारही केली होती पण पत्नीविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी पतीने पुरुवा म्हणून आपल्या फोनमध्येच पत्नीचा पराक्रम शूट केला. व्हिडिओमध्ये आपल्याला पत्नी बेडवर पतीला मारहाण करताना दिसते. ती नवऱ्याच्या छातीवर जाऊन बसते आणि आपल्या पूर्ण ताकदीने पतीला बेदम मारहाण करु लागते.
या दरम्यान एक महिला तिला रोखण्याचा प्रयत्नही करताना दिसते पण ती कुणाचंही काही ऐकून घेण्यास तयार नसते. व्हिडिओच्या शेवटी महिलेने पतीचा काॅलर पकडून ठेवल्याचे दिसते. ती यावेळी प्रचंड रागात असते पण हा राग नक्की कसला याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, पिडित पती हा एक खासदार असल्याचा दावा केला जात आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपला संताप व्यक्त केला तर काहींनी आता बायकोलाही घाबरुन रहावं लागणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
MP man shares secret video of wife assaulting him on bed. Filed multiple police complaints earlier, but no action🥲
pic.twitter.com/6KtQEhRkQe — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 2, 2026
व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर अनेकांनी घटनेवर आपले प्रश्न उपस्थित केले तर काहींनी कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला. व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘खासदाराने पत्नीवर बेडवर मारहाण केल्याचा गुप्त व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी अनेक पोलिस तक्रारी केल्या, पण कारवाई नाही’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तो काहीच प्रतिक्रिया देत नाहीये, कारण त्याला माहीत आहे की तिथे कॅमेरा आहे; कॅमेरा बंद असताना तो कसा वागतो, हे पाहणं उत्सुक ठरेल.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे; तिने कुटुंबात न राहता रुग्णालयात असायला हवे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जर त्या माणसाने चुकूनही तिला केवळ एकदा जरी मारले असते, तर आतापर्यंत तो कदाचित तुरुंगात असता. मात्र, एखाद्या पुरुषाचा छळ होत असेल, तर आपल्या समाजात ते अगदीच सामान्य मानले जाते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






