(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियाचे युग आहे. दररोज सोशल मीडियावर काही ना काही शेअर केलं जात आणि बऱ्याचदा ते व्हायरल देखील होत. इथे कधी स्टंट्ससंबंधित व्हिडिओ शेअर होतात तर कधी असे व्हिडिओ शेअर होतात ज्यांना पाहताच आपण हास्याने लोटपोट होऊ. सध्या मात्र सोशल मीडियावर एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बाईकस्वराचा निष्काळजीपणा त्याला चांगल्याच नडल्याचे दिसून येत आहे. अपघातचा हा थरार तुमच्या अंगावर काटा आणेल.
मागील काही काळापासून अपघाताचे प्रमाण फार वाढले आहे. आजकाल अनेक तरुण तरुणी चालू रस्त्यावर आपली दुचाकी घेऊन स्टंट करू पाहतात. हे स्टंट्स बऱ्याचदा लोकांच्या जीवावर बेततात. मुळातच गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करणे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाची खबरदारी घेणे फार गरजेचे असते. आपली एक चूक आपल्या तसेच समोरच्याच्या जीवावर गंभीर परिणाम करू शकते. सध्याच्या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. व्यक्ती व्हायरल होण्याच्या नादात आपले जीव धोक्यात टाकून स्टंट करू पाहतो आणि शेवटी नको तेच घडून बसते. व्हिडिओतील नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, एक तरुण स्पोर्ट्स बाईक चालवत हात फिरवत आहे. स्टंट्स करत मस्त दिसणे हा त्याचा उद्देश असेल, पण त्याची निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला निमंत्रण देते. तरुण रस्त्यावर झिग-झॅग चालवत होता, तेव्हा समोरून एक मोठी कार आली. गाडीची धडक बसेल तितक्यात हलक्याश्या फरकाने तो थोडक्यात वाचतो आणि त्याचा जीव वाचतो. मात्र यादरम्यान त्याचा तोल ढासळतो आणि परिणामी तो मित्रासह दुचाकीवरून खाली जमिनीवर आदळला जातो. ही संपूर्ण घटना अतिशय भयावह आहे आणि ती पाहूनच लक्षात येते की बाईक चालवताना काळजी घेणे किती गरजेचे आहे. बाईकचालकाची एक चूक त्याच्या मृत्यूला आमंत्रण देऊ शकली पण नशिबाने तो वाचला.
Satisfied, but not completely 😔 pic.twitter.com/wfspy9v3qo
— 𝗟 𝗼 𝗹 𝗹 𝘂 𝗯 𝗲 𝗲 (@Lollubee) January 7, 2025
Viral Video: बाळाला दूध आणायला गेली पण तितक्यात सुरु झाली ट्रेन, डोळ्यातील आक्रोश अन् पुढे काय झालं?
या घटनेचा थरारक व्हिडिओ @Lollubee नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘समाधानी, पण पूर्णपणे नाही’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “स्वतःच्याच जीवाशी यांना का खेळायचे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या चपऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी तुरुंगात टाकले पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.