(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ हरियाणातील अंबाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण रस्त्यांवरुन काही युवक आपल्या थार गाडीत बसून गंतव्यस्थानापर्यंत जात होते. गाडीच्या आत तरुणांची मजामस्ती सुरु होती, ते व्हिडिओ शूट करत होते आणि तितक्यातच अचानक समोरुन एक स्काॅरपिओ येऊन त्यांच्या गाडीला येऊन जोरदार धडक देते. ही धडक इतकी जबरदस्त असते की यामुळे गाडीची फ्रंट काच फुटते, सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण होते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
38 सेकंदाच्या या व्हिडिओत सदर घटनेमुळे आनंदात सुरु असलेला प्रवास अचानक दु:खात बदलल्याचे दिसते. माहितीनुसार, या भीषण अपघातात स्काॅरपिओ चालकाचा मृत्यू झाला आहे तर थार गाडीतील सर्व तरुण गंभीर जखमी झाले आहेत. शेअर केला गेलेला हा व्हिडिओ गाडीच्या आतले दृष्य दाखवतो ज्यात आपल्याला मजामस्ती करता करताच अचानक कसा अपघात घडला ते पाहता येते.
ही घटना आपल्या सर्वांसाठी इशारा आहे की, गाडी चालवतना कधीही आपले लक्ष हे इतर कुठेही न ठेवून समोरच्या रस्त्यावर जास्त असावे. काळोख्या अंधारात स्ट्रीट लाईन नसताना तरुण रिल बनवत गाडीत प्रवास करत होते. परिणामी समोरुन वेगाने आलेली स्काॅरपिओ त्यांना दिसली नाही ज्यामुळे अपघात घडून आला. गाडी चालवताना कधीही रस्ते नियमांचे पालन करायला हवे अन्यथा आपला जीव कधी आपल्यापासून हिरवला जाईल याची शाश्वती देता येत नाही.
Ambala, Haryana: Thar and Scorpio collide head-on on unlit village link road; Scorpio overturns 7–8 times, driver died, others survive with critical injuries pic.twitter.com/ApGVHdR4rC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 2, 2026
अपघाताचे हे दृष्य @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘विना गाव लिंक रोडवर थार आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; स्कॉर्पिओ 7-8 वेळा उलटली, ड्रायव्हर मरण पावला, इतर गंभीर जखमी होऊन वाचले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्या दोघांचेही हाय-बीम चालू होते. वन-वे रस्त्यावर हाय-बीम चालू ठेवणाऱ्या या हरामी लोकांचा मला नेहमीच प्रचंड राग येतो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं दिसतंय की चालकाने सीटबेल्ट लावला नाहीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नेहमीच-अगदी नेहमीच-ते Thar चालक असतात. असं का? ती गाडी आता वेडेपणाचं प्रतीकच बनली आहे की काय?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






