(फोटो सौजन्य: X)
लग्न म्हटले की, त्यात गोंधळ, दिखावा येणारच. लग्नसमारंभातील अनेक अजब-गजब घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतरांपेक्षा काही नवीन करण्याचा प्रयत्नात अनेक प्रयोग फसतात आणि हे आनंदाचे क्षण दुःखात बदलतात. आताही इंटरनेटवर लग्नसमारंभातील एक अशीच घटना व्हायरल झाली आहे ज्यात नवजोडपं हलक्या अंदाजात एंट्री घेऊ पाहू होत मात्र तितक्यात त्यांच्यासोबत एक अपघात घडून येतो. अतिदिखावा आपल्याला कसा नडू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. चला यात काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; VIDEO तुफान व्हायरल
काय आहे व्हिडिओत?
आजकाल अनेक लग्नांमध्ये, दिखाव्यासाठी, वधू-वरांना एक-एक कोल्ड फायर गन दिली जाते आणि हॉलमध्ये एंट्री घेताना ते ही फायर गन हातात घेऊन एंट्री करतात. व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये, वधू आणि वर गाडीच्या छतावर उभे राहून कोल्ड फायर गन वापरताना दिसून आले. फायर गन सुरु करत ते ज्वालांच्या तेजमय प्रकाशाने एंट्री घेतात खरी मात्र तितक्यात वधूच्या गनमध्ये स्फोट होतो आणि यातून बेछूट ज्वाला बाहेर पडतात. यातच वराच्या पगडीला आग लागते आणि सर्वत्र गोंधळ सुरु होतो. आग पाहताच लोक ती विझवण्यासाठी वराच्या दिशेने धाव घेतात आणि वेळीच मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवतात. आजूबाजूचे वर्हाडी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतात. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक यातील दृश्यांनी हादरली आहेत तर काहीजण घटनेतील निष्काळजीपणावर जोरदार टीका करत आहेत.
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 21, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाकी सर्व काही ठीक आहे, पण आग मुलावर होती, बहुतेक लोक मुलीकडे धावले”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोक ही नाटकं का करतात… ते लगेच लग्न का करत नाहीत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.