
अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत... डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral
घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका विटांच्या भिंतीतील लहान छिद्रामध्ये एका कुत्र्याची मान अडकली आहे आणि वारंवार प्रयत्न करूनही तो आपले डोके बाहेर काढू शकत नाही. कुत्रा इतका घट्ट अडकला होता की तो वेदनेने ओरडू लागला. श्ननाचा आवाज ऐकूण आजूबाजूची लोक जमा झाली आणि त्यांनी कुत्र्याची मदत करण्य्या निर्णय घेतला. एका माणसाने हातोडा आणला आणि हळूहळू छिद्राभोवतीच्या विटा तोडायला सुरुवात केली. व्हिडिओतील कॅप्शननुसार लोक श्वानाला या भयंकर अवस्थेतून बाहेर काढण्यास यशस्वी झाले. त्यांनी सुखरुप त्याला विटांच्या भिंतीतून मुक्त केलं. या घटनेमुळे आपण म्हणू शकतो की, अजूनही काहींमध्ये माणूसकी जिवंत आहे.
बेजुबान की मदद के लिए आगे बढ़े हाथ! 🙏🐕
दीवार में फंसे इस डॉगी को सुरक्षित बाहर निकालने का यह वीडियो दिल को छू लेने वाला है। ऐसे लोगों की वजह से ही दुनिया खूबसूरत है। #RescueMission #StreetDogs #Compassion #ViralVideo pic.twitter.com/aIeMyTu50q — Asis Rayasok (@asisrayasok_K) July 16, 2026
मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @asisrayasok_K नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मुक्या जीवांना मदत करण्यासाठी पुढे या! भिंतीत अडकलेल्या कुत्र्याची सुटका केल्याचा हा व्हिडिओ मन हेलावून टाकणारा आहे. अशा लोकांमुळेच हे जग सुंदर आहे’. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “एका जीवाला वाचवणं म्हणजे मोठं पुण्याचं काम”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो कुत्रा भिंतीत अडकला कसा?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अशा घटना पाहिल्या की अजूनही जगात चांगले लोक आहेत यावर विश्वास बसतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.