(फोटो सौजन्य: X)
मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार, सदर घटना ही टेक्सासमधील ह्यूस्टन शहरात घडून आली आहे. इथे राहणारी एक पोल परफाॅर्मर आशा गिल्बर्ट आपल्या अपार्टमेंटनमध्ये नेहमीप्रमाणे डान्सची प्रॅक्टीस करत होती. पण पोलवर चढून तिने प्रॅक्टीसला सुरुवात करताच काहीच क्षणात पोल भिंतीवरुन उघडून खाली पडला. पोल निघाला आणि छतावर असलेल्या फायर स्प्रिंकलरला जाऊन धडकला ज्यामुळे पाण्याचा एक वेगवान फोर्स घरात येऊ लागला. एक प्रकारे पाण्याचा फाऊंटन रुममध्ये आला ज्यामुळे काहीवेळातच खोलीत पाण्याचा पूर आला. या घटनेवेळी आशासोबत तिचा पाळीव कुत्रा देखील खोलित उपस्थित होता जो पाण्याच्या या फव्वाऱ्यामुळे पूर्णपणे भिजला.
आशाने आपला अनुभव शेअर करत म्हटले की, “मी पूर्णपणे सुन्न झाले होते आणि माझे लक्ष फक्त माझ्या निःशब्द कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर केंद्रित होते.” अचानक घडलेल्या या घटनेमुळे आशाला धक्का बसला आणि तिने आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन खोलीतून पळ काढला. यानंतर अग्निशमन दलाला बोलवावे लागले ज्यांनी परिस्थिती हाताळत पाण्याचा प्रवाह बंद केला.
Pole dance routine malfunctions & FLOODS apartment Keep your day job, lady pic.twitter.com/POrmvGwQ6p — RT (@RT_com) July 15, 2026
हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेली पत्नी, पतीने हाणामारी करतच काढलं बाहेर; Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “म्हणूनच, स्प्रिंकलरचे शट-ऑफ व्हॉल्व्ह (पाणी बंद करण्याचे व्हॉल्व्ह) कुठे आहे हे माहीत असणे चांगले… ते कदाचित जिन्याजवळ असू शकते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पोल डान्ससाठी ती जरा जाड वाटत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्वा, पाण्याच्या त्या फव्वारासोबत तिने पोल नाही तर पूल डान्स करायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






