फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्य वाटेल. व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. कधी कोणी एका छतावरून दुस-या छतावर उडी मारतो, तर कधी कोणी म्हातारा झाल्याचा आव आणतो आणि निवृत्तीचे पैसे फसवणुकीवर खर्च करण्याविषयी बोलतो. त्याच वेळी, काही लोक त्यांच्या बनावट लग्नाचे नाटक करतात आणि त्याचा व्हिडिओ शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक मुलगा एका पुतळ्याशी लग्न करतो. त्याच्या या कृतीवर तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित होतात आणि हसतात. असे दिसून येते की, कदाचित त्याला लग्नासाठी मुलगी मिळाली नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बनारसमधील हा व्हिडीओ असल्याच्या दावा देखील केला जात आहे. अनेकांनी या व्हिडीओचा अनंद लुटला आहे.
पुतळ्याला घातला हार
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कपड्यांच्या दुकाना बाहेर एक पुतळा उभा करण्यात आला आहे. आजूबाजूला इत माणसे शॉपिंग करताना दिसत आहे. तितक्यात तेथे एक तरुण येतो आणि त्या पुतळ्याला किस करतो. पण मुलगा इथेच थांबत नाही. स्वत:च्या हातांनी पुतळ्याला हार घालतात. मग तो स्वतःला हार घालतो आणि टाळ्या वाजवू लागतो. यानंतर तो मुलीच्या पायाला स्पर्श करतो. मग तो पुतळा आपल्या मांडीवर घेतो आणि तिथून निघू लागतो. मागे उभे असलेले लोक त्याच्याकडे बघत राहतात. त्या मुलाची कृती पाहून मागे दिसणारी एक युवती त्याच्यावर हसायला लागते. या व्हिडीओवरून दिसून येत आहे की, हा व्हिडीओ केवळ मनोरंजनात्मक दृष्टीकोणातून बनवलेला आहे.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर gudiya.3346 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्ंयत हजारो लाकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडीओवर इन्स्टाग्राम युजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “भाऊ, काय प्रकरण आहे, डमी घेऊन जाणारी मुलगी नाही का?” त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली आहे की चला, वधू आली आहे. भावाकडे पर्याय नव्हता, त्यामुळे पुतळ्याशी लग्न करावे लागले. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे फक्त आपल्या बनारस मध्येच घडू शकते. तर चौथ्या एका युजरने लिहिले आहे की, धक्कादायक! पण आता त्या टेन्शन फ्री बायको मिळाली.