
हमासच्या आंतकवाद्यांनी इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हल (Nova Music Festival) वर हल्ला करुन शेकडो लोकांचा जीव घेतला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना हमास यांच्यामध्ये शनिवारपासून संघर्ष सुरू आहे. आधी हमासने इस्रायलवर रॅाकेट डागले, त्यात अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर संतापलेल्या इस्रायलने प्रत्तुत्तर देत पॅलेस्टिवर हल्ला केला. या हमासच्या आंतकवाद्यांची क्रुरता दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हमासच्या आंतकवाद्यांनी इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हल (Nova Music Festival) वर हल्ला करुन शेकडो लोकांचा जीव घेतला आहे.
इस्रायलमध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासने हल्ला (Hamas Music Festival Attack) केला. रविवारी गाझा जवळील किबुट्झ रीइम (Kibbutz Re’im) जवळ हा म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. ज्यूंचा सण सुक्कोट (Sukkot)च्या समाप्तीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. या हल्ल्यात 260 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.
Missiles were seen flying towards the Music Festival in Israel when the Hamas Militants stormed the Israeli territory 🇮🇱🇵🇸#Israel #Palestine #War #Hamas #Rockets #Gaza #Palestinian#TelAviv #IsraelUnderAttack #IDF #Lebanon #Jerusalem #Hezbollah pic.twitter.com/b7rXVavvrI
— T R U T H P O L E (@Truthpole) October 9, 2023
नेमकं प्रकार काय?
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया सुरु असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.
हमासच्या दहशतवाद्यांनी केला हल्ला
हमासच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली आहे. या हल्ल्यात 700 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सैनिकांचाही समावेश आहे. तर, 1900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये 413 लोकांचा मृत्यू झाला असून 2300 लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन अमेरिकन नागरिकांसह एका फ्रेंच नागरिकाचीही हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यासोबतच 10 नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे