Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपान हादरलं! उत्तर नागानोमध्ये ५.० रिश्टर स्केलचा भूकंप, पंतप्रधान ताकाइची यांनी जारी केला हाय अर्लट

Japan Earthquake : जपान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. जपानच्या उत्तर नागानो प्रांतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली असून हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 04:06 PM
Japan Earthquake

Japan Earthquake

Follow Us
Follow Us:
  • जपान पुन्हा हादरलं
  • उत्तर नागानोमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
  • पंतप्रधान साने ताकाइची यांनी जारी केला हाय अलर्ट
Japan Earthquake News in Marathi :टोकीयो : रिंग ऑफ फायरवर स्थित असलेल्या जपान(Japan)ला पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. जपानच्या उत्तर नागानोमध्ये शनिवारी (१८ एप्रिल) दुपारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जपान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ५.० इतकी नोंदवण्यात आली आहे.

Minamitorishima: जपानला समुद्राच्या 6 किलोमीटर खोलीवर सापडली मौल्यवान खनिजे; ड्रॅगनचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी टोकियो सज्ज

पंतप्रधान ताकाइची यांनी बोलावली आपत्कालीन बैठक

दुपारी १.२० च्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे (Earthquake)लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची तीव्रता लक्षात घेता पंतप्रधान साने ताकाइची यांनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास आणि मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी त्यांनी एक विशेष संकट व्यवस्थापन केंद्र नियुक्त केले आहे. तसेच अफवा पसवणाऱ्याचे काम रोखण्याचा आणि नुकसानीचा आढावा घेण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

ओमाची शहराला सर्वाधिक फटका

या भूकंपाचा सर्वाधिक फटका ओमाची शहराला बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अवघ्या १० किलोमीटर खोलीवर होता. यामुळे धक्के अत्यंत जोरदार होते. ओमाची आणि नागानोमध्ये ५.० तीव्रता नोंदवली आहे. या धक्क्यानंतर आफ्टरशॉकही जाणवला आहे, ज्याची तीव्रता ३.० रिश्टर स्केल होती.

त्सुनामीचा धोका नाही

जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा सर्वात मोठा धोका असतो. परंतु हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्सुनामीचा कोणताही धोका नाही. परंतु खबरदारी म्हणून सध्या अणुउर्जा प्रकल्पांचा तपास सुरु करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान साने ताकाइची यांनी येत्या काही दिवसात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक आपत्कालीन सेवांना आपत्कालीन कीट तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जपानमध्ये सतत भूकंप का होतात?

जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. येथे पॅसिफिक, युरेशियन, फिलीपिन्स आणि उत्तर अमेरिकन या टेक्टॉनिक प्लेट्स असून या सतत एकमेकांवर आदळत असतात. यातून घर्षण तयार होते आणि यामुळे भूकंपीय क्रियाकलाप होतात. यामुळे जपानमध्ये सतत भूकंप होत असतात. यामुळे त्सुनामीचा आणि ज्वालामुखीचा देखील मोठा धोका असतो. हा देश सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे.

Israel Lebnon War : इस्रायल माघार घेणार? लेबनॉनचा कायमस्वरूपी युद्धबंदीचा प्रस्ताव, जनतेला एकजुटीचे आवाहन

Web Title: 5 point 0 magnitude earthquake strikes central japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Earthquake
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
1

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
2

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
3

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?
4

Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.