काही दिवसांपुर्वी इराणमध्ये हिजाबवरुन झालेल्या आंदोलनात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. या आंदोलनाची धग अद्याप कायम असताना आता इराण सरकारने महिलांसाठी पुन्हा नवा फतवा काढला आहे. आता इराणमधील महिलांनी हिजाब घातला नाही (Iran Hijab Bill) किंवा घट्ट कपडे घातले तर त्यांना आता 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. एवढेच नाही तर हे नियम आणि कायदे आता पुरुषांनाही लागू होतील.
[read_also content=”मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार! पोलिस ठाण्यावर जमावाचा हल्ला; अनेक जण जखमी https://www.navarashtra.com/india/manipur-violence-out-break-again-mod-attacked-on-police-station-nrps-460485.html”]
इराणच्या संसदेने एक विधेयक मंजूर केले आहे, इराणच्या 290 सदस्यीय संसदेतील 152 खासदार या विधेकयाच्या बाजूने होते. ज्यात सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणाऱ्या महिलांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मोठा दंड आकारला जाईल. हिजाबशिवाय महिलांना वस्तू विकणाऱ्या पुरुषांनाही कठोर शिक्षा केली जाईल. असे सांगण्यात आलं आहे.
सध्याच्या कायद्याच्या तुलनेत प्रस्तावित कायद्यातील शिक्षेची मुदत 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 लाख ते 6 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हिजाबची खिल्ली उडवणाऱ्या कोणत्याही मीडिया किंवा एनजीओला दंड आणि तुरुंगवास भोगावा लागेल.
स्वित्झर्लंडच्या संसदेने चेहरा झाकण्यावर (बुरखा) बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे. विधेयकाच्या बाजूने 151 तर विरोधात 29 मते पडली. स्विस संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 92 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.