संग्रहित फोटो
काबुल : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांविरोधात हिणकस आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या शिक्षा देण्याचा प्रघात तालिबानकडून सुरू करण्यात येत आहे. व्याभिचाराबद्दल यापुढे महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
तालिबानचे प्रमुख नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांनी ही घोषणा केली असून, त्यांचा संदेश टीव्हीवर दाखविण्यात आला, असे वृत्त आहे. प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये अखुंदजादा म्हणतो की, आंतरराष्ट्रीय समुदाय स्त्रियांच्या ज्या हक्कांची वकिली करतो, ते हक्क तालिबानच्या इस्लामिक शरियतच्या व्याख्येविरोधात आहे. महिलांना दगडाने ठेचून जीवे मारणे महिलांच्या अधिकारांच्या विरोधात आहे.
आम्ही लवकरच व्याभिचाराच्या विरोधात या शिक्षेची अंमलबजावणी करणार आहोत. आम्ही महिलांना सार्वजनिक ठिकाणी उभे करून फटके मारू. त्यांना दगडाने ठेचून टाकू. फक्त काबूल ताब्यात घेऊन तालिबानचे काम संपलेलेल नाही, आता तर आमचे काम सुरू झाले आहे.






