Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये अचानक आलेल्या पूरामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 02:30 PM
Afghanistan Flood

Afghanistan Flood

Follow Us
Follow Us:
  • अफगानिस्तानमध्ये  अचानक आलेल्या पुराचा कहर
  • २० जणांचा मृत्यू
  • शेकडो बेपत्ता
Afghanistan Flood News in Marathi : काबूल : अफगाणिस्तानवर पुन्हा मोठे संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची पुष्टी केली. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

US Canada Trade : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! कॅनडावर फोडला टॅरिफ बॉम्ब; व्यापारयुद्ध पेटणार?

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या नुरिस्तान प्रदेशात हा पूर आला असून यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०० हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात जावित आणि वित्तहानी

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते युसूफ हम्माद यांनी नूरिस्तानच्या परिसरातील सर्व नागरिकांना पूरग्रस्त आणि अति धोकादायक क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नूरिस्तान प्रदेशात अनेक भागांमध्ये भीषण पूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरामुळे घरे, शेतजमीन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे युसूफ यांनी सांगितले.

आणखी मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान हवामान विभागाने देशातील १० प्रदेशांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पाऊस, वादळ, धूळ आणि वाळू वाहून नेणारे जोरदार वारे आणि अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारने किनारी भागांपासून आणि पूरप्रवण क्षेत्रांजवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे.

नैसर्गिक आपत्तींचा कहर

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील हवामानातील बदल आणि नैसर्गित आपत्तींचा धोका सतत असतो. बर्फवृष्टी आणि मुसळधार पासामुळे अचानक पूर येतो. अशा घटनांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. २०२४मध्ये अचानक आलेल्या पुरामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर वर्षाच्या सुरुवातील पूर आणि दरडी कोसळल्यामुळे ११० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच भूकंपाच्याही सतत घटना घडत असतात.

अफगाणिस्तानमध्ये अनेक दशकांपासून सुरु असलेला संघर्ष, कमकुवत पायाभूत सुविधा, कमकुवत अर्थव्यवस्था, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम दुर्गम भागांवर होत आहे. अफगाणिस्तानमधील मातीची घरे अचानक येणारा पूर किंवा मूसळधार पाऊसापासून संरक्षण करु शकत नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानीच्या घटना घडतात.

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Web Title: Afghanistan flood 20 killed hundreds missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Afghanistan
  • flood
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
4

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.