Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘America Frist’ धोरणाचा पुन्हा नारा! ट्रम्पचे ग्रीनलँड, पनामा कालवा आणि नाटोवर वादग्रस्त विधाने, जगात खळबळ 

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांनी ग्रीनलँड, पनामा कालवा, नाटो यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर कडक भूमिका घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 09:01 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्पचा जगाला कडक संदेश
  • नाटो, पनामा कालवा आणि ग्रीनलँडवर वादग्रस्त विधान
  • अमेरिका फर्स्ट धोरणाचा नारा
Donald Trump News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ट्रम्प यांना काल २० जानेवारी २०२६ रोजी दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळाला एक वर्षे पूर्ण झाली. या निमित्त त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर कडक भूमिका घेतली. ट्रम्प यांनी नाटो, रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War), ग्रीनलँड, पनामा कालवा, इराण आणि युरोपीय देशांसोबत सुरु असलेल्या तणावावर वादग्रस्तव विधाने केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

नाटोवर ट्रम्पची भूमिका

ट्रम्प यांनी सुरुवातील नाटोवर भाष्य केले. त्यांनी नाटोतील अमेरिकेच्या भूमिकेवर भर देत दावा केला की, आतापर्यंत कोणत्याही जिवंत आणि मृत नेत्यापेक्षा अधिक काम त्यांनी केले आहे. पण भविष्यात अमेरिका नाटोच्या मदतीला धावून गेला तर इतर सदस्य देश साथ देतील का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वातच राहू शकत नाही असेही त्यांनी म्हटले.

रशिया युक्रेन युद्ध

याच वेळी ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धावर बोलताना म्हटले की, या देशांमधील युद्ध संपवणे कठीण आहे. कधी रशिया युद्धबंदीसाठी तयार नसतो, तर कधी युक्रेन नसतो. दोन्ही देशांनी आमचे ऐकले असते तर आज परिस्थिती वेगळी असती असेही ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या मते दोन्ही देशात समन्वय नसल्यामुळेच युद्धबंदीत अडथळे येत आहेत.

ग्रीनलँडवरुन पुन्हा वादग्रस्त दावा

याशिवाय गेले काही दिवस ग्रीनलँडवरुन ट्रम्प सतत आक्रमक होताना दिसत आहे. काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्येही ट्रम्प पुन्हा आक्रमक होताना दिसले. ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीच्या मुद्यावरुन भविष्यात सर्व काही स्पष्ट होईल असे रहस्यमयी विधान केले यामुळे ट्रम्प नेमका कोणता डाव खेळताय हे अस्पष्टच म्हणायचे.  याच वेळी ट्रम्प यांनी पनामा कालव्याचाही उल्लेख केला. भविष्यात पनामा कालवा देखील अमेरिकेच्या नियंत्रणाखाली येऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे ट्रम्प यांनी इराण आणि युरोपीय देशांबाबतही वादग्रस्त विधाने केली. ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेच्या दबावामुळे इराणने लोकांची फाशीची शिक्षा तात्पुरती रद्द केली आहे. परंतु भविष्यात जर कोणालाही फाशी देण्यात आली तर लष्करी कारवाईचा पर्याय अमेरिकेकडे आहेच असे त्यांनी स्पष्ट केले. तर युरोपी देशांच्या नेत्यांशी सुरु असलेल्या वादावरुन त्यांनी टीका केली. तसेच नॉर्वेवर नाराजी व्यक्त करत नोबेल पुरस्काराची मागणी केली.

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO

 

Web Title: America first trumps controversial statements on greenland panama canal nato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict : ट्रम्प इराणला उद्ध्वस्त करणार होते, पण ‘या’ व्यक्तीच्या एका इशाऱ्याने सगळंच बदललं! नेमकं काय घडलं?
1

US Iran Conflict : ट्रम्प इराणला उद्ध्वस्त करणार होते, पण ‘या’ व्यक्तीच्या एका इशाऱ्याने सगळंच बदललं! नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी
2

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा
3

Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने ‘तो’ फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO
4

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.