Greenland Controversy : ग्रीनलँड अमेरिकेचाच! ट्रम्पने 'तो' फोटो शेअर करत दिला इशारा; डेन्मार्कचा चढला पारा (फोटो सौजन्य: @TrumpDailyPosts)
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ग्रीनलँड अमेरिकेच्या भाग असलेल्या दृश्याचा एक एआय फोटो शेअर केले आहे. या फोटोत उपराष्ट्रपती जे.डी व्हॅन्स आणि परराष्ट्र संरक्षण सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत ट्रम्प अमेरिकेचा झेंडा घेऊन ग्रीनलँडमध्ये उभे आहेत. तर बाजूला एक फलक लावण्यात आला आहे. ज्यावर ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टोबल्ड २०२६ असे लिहिले आहे. ट्रम्प यांनी हा फोटो शेअर करत ग्रीनलँडला अमेरिकेत सहभागी करुन घेण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. यामुळे युरोपीय देशांमध्ये आणि ग्रीनलँडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, अमेरिकेला ग्रीनलँडची गरज असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी ग्रीनलँडमधील डॅनिश लोकांची स्तुती केली. डॅनिश लोक अद्भुत आहे आणि त्यांचे नेते महान आहेत असे ट्रम्प यांनी म्हटले. पण अमेरिकेला तिथे जाऊन बेटावर नियंत्रण घेणे शक्य नसून आम्ही यावर वेगवेलगळ्या लोकांशी चर्चा करत आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी नाटोबाबत बोलताना म्हटले की, अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वाकच आली नसती. त्यांनी सांगितले की, नाटोमध्ये अमेरिकेने जास्त योगदान दिले आहे. तसेच यामध्ये सगळ्यात जास्त योगदान ट्रम्प यांच्या काळात देण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी जगभर शांतता निश्चित करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
दुसरीकडे डेन्मार्कवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्कचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्क ग्रीनलँडमध्ये सैन्य सराव करत आहे. यामध्ये, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, नेदरलँड्स, फिनलँड, या देशांचाही समावेश आहे. पण यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी १०% टॅरिफ लादले असून हे अधिक वाढवण्याची धमकीही दिली आहे.
Donald J. Trump Truth Social Post 01:00 AM EST 01.20.26 President Trump posts a photo holding the U.S. flag along with JD Vance and Marco Rubio that indicates that Greenland will become U.S. territory sometime in 2026. pic.twitter.com/ogKImcFd3W — Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) January 20, 2026
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन एक वादग्रस्त एआय फोटो शेअर केला आहे. यामध्ये ग्रीनलँडवर ट्रम्प, जेडी व्हॅन्स आणि रुबियो अमेरिकेचा झेंडा घेऊन उभे आहेत आणि बाजूला ग्रीनलँड यूएस टेरिटरी एस्टोबल्ड २०२६ असा लिहिलेला फलक आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
Ans: अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वाकच आली नसती आणि यामध्ये ट्रम्प यांच्या काळात जास्त योगदान देण्यात आले असल्याचे ट्रम्प यांवनी म्हटले आहे.






