World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हानं, पाहा VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड विकत घेयचे आहे. परंतु ग्रीनलँड, डेन्मार्क आणि इतर काही युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला आहे. यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळेच ग्रीनलँडमध्ये डेन्मार्क आपले सैन्य प्रस्थापित करत आहेत. तसेच फ्रान्स (France), ब्रिटन(Britain), जर्मनी(Germany) ने देखील आपली एक तुकडी ग्रीनलँडमध्ये पाठवली आहे. परंतु यामुळे आर्क्टिक प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डेन्मार्कची लष्करी तुकडी ग्रीनलँडमध्ये तैनात झाली आहे. या रॉयल डॅनिश आर्मीचे सैन्य पश्चिम ग्रीनलँडमधील कांगेरलुसुआक भागात उतरले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून डेन्मार्क या बेटावर आपली उपस्थिती वाढवत आहे.यापूर्वी डेन्मार्कने ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये देखील ११० सैन्याची तुकडी तैनात केली आहे.ही डेन्मार्कची आर्क्टिक एन्ड्युरन्स ट्रेनिंग एक्सरसाइज आहे. सैन्य दिर्घकालापर्यंत तैनात केले जाणार आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवरच ही सर्व तयारी केली जात आहे. सध्या यामुळे युरोप आणि अमेरिकेतही तणाव वाढला आहे.
ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, ग्रीनलँड त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विकत घ्यायचा आहे. कारण या भागात चीन आणि रशियाची उपस्थिती वाढत चालली असून यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होत आहे. यामुळेच या भागातील चीन रशियाचा प्रभाव रोखण्यासाठी ट्रम्प यांना ग्रीनलँड हवे आहे.
Denmark sends more troops, including the chief of the Danish Army, to Greenland. Trump has declined to rule out using force to seize control of the Arctic island, Danish Army will obviously be obliterated in case Trump launches an invasion #Greenland #Davos #Trump pic.twitter.com/X6hs8lRAX4 — Atishay Jain (@AtishayyJain96) January 20, 2026
Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा
Ans: ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे आणि ग्रीनलँडवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांमुळे ग्रीनलँडमध्ये डेन्मार्कने सैन्य का तैनात केले आहे.
Ans: ग्रीनलँड हा एक स्वायत्त बेट असून तो डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली येतो.






