Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Egypt Tombs: सोन्याच्या जिभा, दुसऱ्या जगाचा दरवाजा, देवांशी संबंध; इजिप्तमध्ये सापडल्या 2000 वर्षे जुन्या प्राचीन रहस्यमयी 18 कबरी

इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना आश्चर्यकारक अवशेष असलेल्या १८ कबरी सापडल्या आहेत. या कबरी सुमारे २,००० वर्षे जुन्या असल्याचा अंदाज असून, त्यांचा संबंध इतिहासातील दोन महान राजवंशांशी जोडला जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 13, 2026 | 04:24 PM
ancient egypt 18 tombs discovered with gold tongues mummies marina el alamein

ancient egypt 18 tombs discovered with gold tongues mummies marina el alamein

Follow Us
Follow Us:
  • २००० वर्षे जुन्या १८ कबरींचा शोध
  • ममींच्या तोंडात सोन्याच्या जिभा
  • परलोकाचा रहस्यमयी दरवाजा

Marina El Alamein Egypt excavation : प्राचीन इतिहास, रहस्यमयी ममी आणि पिरॅमिडसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या इजिप्त देशामध्ये पुन्हा एकदा पुरातत्वशास्त्रज्ञांना एक अत्यंत मोठा आणि थक्क करणारा शोध लावण्यात यश आले आहे. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मरीना अल-अलामीन (प्राचीन लुकॅस्पिस बंदर) या शहरात तब्बल १८ प्राचीन कबरींचा शोध लागला आहे. या कबरी सुमारे २,००० वर्षे जुन्या असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला असून, त्यांचा ऐतिहासिक संबंध थेट ‘अलेक्झांडर द ग्रेट’ (सिकंदर) याच्या ग्रीक आणि त्यानंतरच्या रोमन साम्राज्याशी जोडला जात आहे. या शोधामुळे प्राचीन इजिप्तमधील अंत्यविधीच्या परंपरा आणि त्यांच्या गूढ धार्मिक श्रद्धा पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत.

हा शोध ज्या ठिकाणी लागला आहे, ते ठिकाण अलेक्झांड्रिया शहराच्या पश्चिमेला साधारण १०० किलोमीटर अंतरावर आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, या १८ कबरींपैकी ११ कबरी या जमिनीखाली अतिशय खोलवर (सुमारे २६ फुटांपेक्षा जास्त खोलीवर) दगड कापून तयार केलेल्या तळघरात (कॅटाकॉम्ब्स) होत्या. तर उर्वरित ७ कबरी या जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ, चुनखडीचा वापर करून बांधलेल्या होत्या. काही कबरींचे दरवाजे तर गेल्या दोन हजार वर्षांपासून त्यांच्या मूळ दगडी पात्याने बंद होते, जे पहिल्यांदाच उघडण्यात आले. यात शास्त्रज्ञांना एक तब्बल ८.२ फूट लांबीचा ग्रॅनाइटचा महाकाय शवपेटी (सार्कोफॅगस) देखील सापडला असून, त्याचे झाकण पूर्णपणे सुरक्षित आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी

सोन्याची जीभ आणि देवांचे मांस: ममींच्या तोंडातील गूढ

या संपूर्ण उत्खननात ज्या गोष्टीने जगभरातील संशोधकांना आणि इतिहासकारांना सर्वात जास्त चकित केले, ती म्हणजे कबरींमधील मानवी अवशेषांच्या तोंडात सापडलेल्या सोन्याच्या जिभा! पुरातत्वशास्त्रज्ञांना या कबरींमध्ये एकूण २४ सोन्याच्या जिभांचे तुकडे सापडले आहेत. हे सोन्याचे नाजूक आणि पातळ फॉइल (पाने) मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या तोंडात अतिशय काळजीपूर्वक ठेवले गेले होते. यासोबतच प्राचीन इजिप्तचा प्रसिद्ध संरक्षक देव ‘होरस’ याच्या डोळ्याच्या आकाराचे (Eye of Horus) एक सोन्याचे लॉकेटही सापडले आहे, जे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी वापरले जात असे.

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये सोन्याला अत्यंत पवित्र आणि दैवी स्थान होते. त्या काळातील लोकांची अशी प्रबळ श्रद्धा होती की, सोने हे ‘देवांचे मांस’ (Flesh of the Gods) आहे आणि ते कधीही नष्ट होत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याची बोलण्याची नैसर्गिक क्षमता संपते. परंतु, परलोकात (Afterlife) गेल्यानंतर जेव्हा ही मृत व्यक्ती नरकाचा आणि मृत्यूचा देव ‘ओसिरिस’ (Osiris) याच्या दरबारात न्यायासाठी उभी राहील, तेव्हा तिला स्वतःची बाजू मांडता यावी आणि देवाशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांच्या तोंडात ही सोन्याची जीभ ठेवली जात असे. या धार्मिक विधीमुळे मृत व्यक्तीला परलोकात एक नवी दैवी वाणी प्राप्त होते, असा त्यांचा विश्वास होता.

‘फॉल्स डोअर’ म्हणजेच परलोकाचा आभासी दरवाजा

या प्राचीन कबरींमध्ये केवळ ममी आणि सोन्याच्या जिभाच नाही, तर अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी एक विशेष वेदी (Offering Altar) देखील सापडली आहे. या वेदीच्या खालच्या भागावर अत्यंत बारीक नक्षीकाम करून एका लाकडी दरवाजाची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. पुरातत्व शास्त्रात याला ‘फॉल्स डोअर’ (False Door) म्हणजेच आभासी किंवा मिथक दरवाजा असे म्हटले जाते. प्राचीन इजिप्शियन वास्तुकलेचा आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनावरील विश्वासाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी

इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाचे उपसचिव हाशेम हुसेन यांनी यावर प्रकाश टाकताना सांगितले की, पारंपारिक इजिप्शियन समजुतीनुसार हा दरवाजा जिवंत लोकांचे जग आणि मृतांचे जग यांच्यातील एक अदृश्य सीमा किंवा दुवा मानला जात असे. हा वास्तविक पाहता आरपार जाण्याचा दरवाजा नसून, एक आध्यात्मिक मार्ग होता. प्राचीन लोकांचा असा विश्वास होता की, मृत व्यक्तीचा आत्मा या दरवाजातून प्रवास करून जिवंत नातेवाईकांनी तिच्यासाठी आणलेला नैवेद्य, अन्न आणि पाणी स्वीकारू शकतो. हा दरवाजा म्हणजे दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारे एक माध्यम होते.

अलेक्झांडर द ग्रेट आणि क्लिओपात्राशी असलेला ऐतिहासिक संबंध

या १८ कबरींचा शोध ज्या कालखंडातील आहे, तो इतिहासप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक आहे. संशोधकांच्या मते, या कबरी टॉलेमी (Ptolemaic Period – इ.स.पूर्व ३२२ ते इ.स.पूर्व ३०) किंवा रोमन (Roman Period – इ.स.पूर्व ३० ते इ.स. ३९५) कालखंडातील आहेत. अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर) याने जेव्हा इजिप्त जिंकला, तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या एका बलाढ्य सेनापतीने म्हणजेच ‘टॉलेमी प्रथम’ याने इजिप्तवर स्वतःच्या राजवंशाची स्थापना केली. या प्रसिद्ध टॉलेमी राजवंशाची शेवटची आणि सर्वात लाडकी सम्राज्ञी म्हणजे ‘राणी क्लिओपात्रा’ (Cleopatra VII).

इ.स.पूर्व ३० मध्ये क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर इजिप्तवर ग्रीक राजवट संपली आणि तो रोमन साम्राज्याचा एक भाग बनला. मरीना अल-अलामीन येथे सापडलेल्या या कबरी नेमक्या याच संक्रमण काळातील आहेत. येथे ग्रीक संस्कृतीची देवता ‘अॅफ्रोडाईट’ (Aphrodite – प्रेम आणि सौंदर्याची देवी) हिचा एक अपूर्ण पुतळा देखील सापडला आहे. यावरून स्पष्ट होते की, त्या काळात इजिप्शियन संस्कृतीमध्ये ग्रीक आणि रोमन धार्मिक संस्कृती मोठ्या प्रमाणावर मिसळली गेली होती. या शहरात मिळालेल्या मातीची भांडी, नाणी आणि दिवे यावरून हे सिद्ध होते की, हे ठिकाण त्या काळी भूमध्य समुद्रातील एक अत्यंत समृद्ध व्यापारी केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बंदर होते.

Web Title: Ancient egypt 18 tombs discovered with gold tongues mummies marina el alamein

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Egypt
  • mummy
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.