Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जेंटिनात फ्लाइट इन्स्ट्रक्टरची उडत्या विमानातून उडी; ट्रेनी पायलटचा गोंधळ उडाला अन्…; जाणून घ्या पुढं काय घडलं?

अर्जेंटिनात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रशिक्षणादरम्यान एका फ्लाइट इन्स्ट्रक्टरने विमानातून उडी मारुन आपले जीवन संपवले आहे. या इन्स्ट्रक्टरने अचानत उडी मारल्याने ट्रेनी पायलटचा गोंधळ उडाला होता. परंतु तिने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षित लँड केले. नेमकं काय घडलं ? जाणून घ्या

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 11:26 AM
Argentina

Argentina

Follow Us
Follow Us:
  • अर्जेंटिनात फ्लाइट इन्स्ट्रक्टरची उडत्या विमानातून उडी
  • ट्रेनी पायलटचा गोंधळ उडाला अन्…
  • जाणून घ्या पुढं काय घडलं?
अर्जेंटिनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रशिक्षणादरम्यान फ्लाइट इन्स्ट्रक्टरमे उडत्या विमानातून उडी मारुन स्वत:चे जीवन संपले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पण याच वेळी त्याच्यासोबत असलेल्या २२ वर्षीय ट्रेनी पायलटने प्रसांगावधान राखत विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले आहे.

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

नेमकी घटना काय?

मीडिया रिपोर्टनुसार, ०४ जुलै रोजी ही घटना घडली. अर्जेंटिनातील कॉर्डोबा प्रदेशात टोलेडे परिसरात एका फ्लाइट इन्स्ट्रक्टरने उडत्या विमानातून उडी मारली. या वैमानिकाची ओळख ४२ वर्षीय लिएंड्रो अँड्रेस बर्टाजो अशी पटवण्यात आली आहे. लिएंड्रो स्थानिक पायलट प्रशिक्षक केंद्रात कार्यरत होता. घटनेच्या वेळी तो ट्रेनी पायलट रोसारियोला विमान उडवण्याचे प्रशिक्षण देत होता.

यावेळी उड्डाण सुरु असताना अचानक लिएड्रो याने हेडफोन काढले, सीटबेल्ट सोडला आणि विमानाचे दार उघडले. यानंतर उडी मारण्यापूर्वी त्याने ट्रेनीला तुला काय करायचं आहे, ते माहित आहे असे म्हटले आणि पॅराशूटशिवाय उडत्या विमानातून उडी मारली. यामुळे जमिनीवर आदळताच त्याचा जागीच मृत्यू झाला.

ट्रेनी पायलटचे काय झाले?

या अचानक झालेल्या घटनेमुळे ट्रेनी पायलटलचा काही क्षण गोंधळ उडाला होता. परंतु तिने धीर धरत तातडीने एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधला. एअर ट्राफिक कंट्रोलच्या मदतीने विमान सुरक्षितपणे लँड केले. विमान लँडकेल्यानंतर ट्रेनीनी संपूर्ण घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. यानंतर बचाव पथकाने पायलटचा मृतदेह शोधून काढला.

घटनेचा तपास सुरु

सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे आढळले. तसेच पायटचाही तोल जाऊन अपघात झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. यामुळे पायटलने आत्महत्या केल्याची जास्त शक्यता आहे. सध्या या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

प्रशिक्षण केंद्राची प्रतिक्रिया

फ्लाइट प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणापूर्वी लिएंड्रोच्या वागणुकीत कोणत्याही संशायस्पद हावभाव किंवा हालचाली जाणवल्या नाहीत. तो नेहमीप्रमाणे पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी उड्डाणास गेला होता. परंतु काही वैयक्तिक अडचणीमधून जात असल्यानेच त्याने आपले जीवन संपवले असण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. या घटनेने अर्जेंटिनात खळबळ उडाली आहे.

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Web Title: Argentina flight instructor jumps from plane trainee pilot saves aircraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Plane Accident
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.