
Ayatollah Khamenei Funeral
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनेई यांच्यावर सार्वजनिकरित्या अंतिम संस्कार केले जातील. हा कार्यक्रम तीन दिवस असणार असून यावेळी इस्लामिक पंरपरा आणि रुढींचे पालन केले जाईल.
Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले
तेहरानचे उपमहापौर मोहम्मद अमीर तवाकोली-जादेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनेई यांच्या स्मरणार्थ देशभरात अनेक शहरांमध्ये शोकसभांचे आयोजन केले जाणार आहे. राजधानी तेहरान, कोम आणि मशहद या धार्मिक शहरांमध्ये मोठे जुलूस काढले जातील. या कार्यक्रमात तब्बल २ कोटी इराणी नागरिक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
आज खामेनेई यांच्या मृत्यूला ९५ दिवस पूर्ण होत आहेत. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर काही दिवसांतच दफनविधी पूर्ण केली जाणार होती. ०४ मार्च रोजी त्यांच्या दफनविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे अनिश्चित काळासाठी दफनविधी पुढे ढकलण्यात आला.
याच वेळी खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या दफनविधीत सहभागाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. खामेनेईंचा वारस म्हणून त्यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली होती. परंतु ते अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाही. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची किंवा ते गंभीर जखमी असल्याचा दावा आहे.
तर दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ते सुरक्षित असून अमेरिकी-इस्रायली हल्ल्यांमुळे भूमिगत झाले असल्याचे सांगितले. परंतु वडिलांच्या दफनविधी कार्यक्रमात ते सहभागी होणार का, हे अद्याप स्पष्ट नाही.
खामेनेई हे इराणचे दुसरे सर्वोच्चे नेते होते. त्यांनी १९ एप्रिल १९३९ पासून ते २८ फेब्रुवारी २०२६ म्हणजे जवळपास ३७ वर्षे इराणवर राज्य केले. त्यांची इराणच्या इतिहासात आणि मध्यपूर्वेतील राजकारणातील भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण, वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी १९६०-७० च्या शकात इराणचे तत्कालीन राजे शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या पाश्चात्य धोरणांन तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांना ६ वेळा अटकही करण्यात आली होती. त्यांनी १९८१ ते १९८९ च्या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवले होते. यानंतर १९८९ नंतर खोमेनी यांच्या निधानानंतर ते इराणचे सर्वोच्च नेते बनले.
Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी
Ans: इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा दफनविधी आज, ०३ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. विधी नेमका कुठे केला जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये शोकसभेचे आणि जुलूसचे आयोजन करण्यात येणार आहे.
Ans: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल-अमेरिकेले केलेल्या हवाई हल्ल्यात पहिल्याच दिवशी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले होते.
Ans: अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मोजतबा खामेनेई जखमी झाले होते. यानंतर ते सुरक्षेच्या कारणास्तव भूमिगत झाले असून सध्या ते अयातुल्ला खामेनेईंच्या दफनविधीत सहभागी होतील काय याबाबत अस्पष्टता आहे.