Iran Execution : इराणची मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी मोठी कारवाई; ३ नराधमांना थेट फासावर चढवले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
रिपोर्टनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये इराणच्या घोरवे शहरा दोन व्यक्तींनी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषणाचे आरोप ठोठावण्यात आले होते. सुनावणी दरम्यान गुन्हा सिद्ध होताच न्यायालयाने त्यांना तातडीने शिक्षा सुनावली. तर दुसऱ्या एका प्रकरणात ऑगस्ट २०२५ मध्ये एका १० वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करुन त्याची हत्या केली होती. या प्रकरणातही न्यायालयाने तातडीने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
इराणमध्ये लैंगिक शोषण, हत्या, ईशनिंदा आणि हेरगिरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाचीच तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये इराणच्या न्यायालयाकडून तातडीने सुनावणी केली जाते. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, फाशीची शिक्षा सुनावण्याच्या संख्येबाबत चीन पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांक इराणचा लागतो.
ॲम्नेस्टी इंटरनॅशलच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी २०२५ मध्ये इराणने तब्बल २,१५९ लोकांनी मृत्यूदंड ठोठावला होता. तर ४४ जणांना तातडीने फाशी देण्यात आली होती. २०२४ च्या तुलनेत गेल्या वर्षी फाशीच्या शिक्षांच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इराणच्या या कठोर कारवाईनंतर तेथील बालसुरक्षा आणि न्यायव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
इराणने सर्वाधिक फाशीची शिक्षा इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्यांना दिली आहे. रिपोर्टनुसार, इस्रायलशी संघर्षानंतर इराणने देशव्यापी मोहिम राबवली होती. याअंतर्गत ७०० हून अधिक संशयितांना अट केली असून आतापर्यंत किमान १५ हून अधिक लोकांना मोसादचे एजंटच्या आरोपावरुन फाशी दिली आहे. याबाबत निश्चित आकडा सार्वजनिक करण्यातआलेला नाही. परंतु, ही इराणची इस्रायलविरोधात सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
हे देखील वाचा : Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा






