Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराकच्या अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उम्म कासर बंदरावर माल उतरवल्यानंतर इराकच्या सगारी हद्दीत पनामा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजावर हल्ला झाला. बंदराच्या आग्नेये दिशेला ४० किमी अंतरावर ही घटना घडली. MSC SARISKA V या जहाजावर दोन भीषण स्फोट झाले. यामुळे जहाजावर प्रचंड आग लागली होती. सुदैवाने, आग तातडीने नियंत्रणात आणल्याने कोणीतीही जीवितहानी झाली नाही.
रिपोर्टनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. युनायडेट किंग्डम मरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स(UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावर पहिला हल्ला क्रूझ क्षेपणास्त्रने तर दुसरा ड्रोन हल्ला करण्यात आला. तसेच ही कारवाई प्रत्युत्तरात्मक असल्याचेही IRGC ने स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यानंतर खाडी परिसरात सागरी सुरक्षेची चिंता वाढली आहे. होर्मुझची खाडी आणि आसपासचा परिसर हा जागतिक व्यापार वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, मध्यपूर्वेतील वाढता तणावामुळे तेल वाहतूक आणि पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या हल्ल्याबाबत दोन्ही देशांकडून अधिकृत तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतची चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, इराणच्या IRGC कडून वाटाघाटी प्रक्रिया सुरु आहे. परंतु दोन्ही देश कराराच्या किती जवळ आहेत हे पूर्णपणे स्पष्ट नाही. याच वेळी खाडीत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिका इराणवर युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
A Panama-flagged cargo ship exploded in Iraqi territorial waters near Umm Qasr port after completing the unloading of its cargo, Alsumaria News reported. Security officials said the blast on the MSC SARISKA V was caused by a technical fault. However, United Kingdom Maritime Trade… pic.twitter.com/WXkMqBPvV5 — Iran International English (@IranIntl_En) June 1, 2026
Massachusetts Meteor : अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये उल्कापात? जोरदार स्फोटांनी इमारती हादरल्या
Ans: इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ आग्नेये दिशेला ४० किमी अंतरावर मालवाहू जहाज MSC SARISKA V दोन भीषण हल्ले झाले.
Ans: इराकच्या बंदरगाजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या रिव्लोहल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने स्वीकारली आहे.






