जहाजाच्या ब्लॅक बॉक्समध्ये सापडला ऑडिओ, अपघातापूर्वी पायलटने दिला होता इशारा!

दली या मालवाहू जहाजाच्या ब्लॅक बॉक्सच्या व्हॉयेज डेटा रेकॉर्डरमधून काही ऑडिओ फाइल्स सापडल्या आहेत. यात अपघातापूर्वी संभाषण आणि महत्त्वाचे तपशील समाविष्ट आहेत.

    मंगळवारी रात्री 1.27 च्या सुमारास 984 फूट लांबीचे मालवाहू जहाज फ्रान्सिस स्कॉट की पुलावर (Baltimore Bridge Collapsed) धडकले. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा पूल काही सेकंदातच पटापस्को नदीत बुडाला. पूल तुटल्यामुळे अनेक देशांचा बाल्टिमोर बंदराशी संपर्क तुटला. या अपघाताप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या टीमला एक महत्त्वाची गोष्ट सापडली आहे.  तटरक्षक दलाने मंगळवारी जहाजाच्या ब्लॅक बॉक्सच्या व्हीडीआरमधून ऑडिओ जप्त केला आहे. हा ऑडिओ NTSB अधिकाऱ्यांना देण्यात आला.

    कसा घडला अपघात?

    अमेरिकेच्या मेरीलँड राज्यांतर्गत येणाऱ्या बाल्टिमोर शहरात मंगळवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजवर ‘डाली’ या मोठ्या कंटेनर जहाजाची पुलाला टक्कर झाली. यानंतर पूल तुटून पटापस्को नदीत पडला. या धडकेमुळे अनेक वाहने आणि लोकही नदीत पडले. डाली जहाज बाल्टिमोरहून श्रीलंकेची राजधानी कोलंबोसाठी रवाना झाले होते.

    ब्लॅक बॉक्समध्ये काय

    जहाजाच्या अपघातानंतर  तपास करणाऱ्या टीमला एक महत्त्वाची गोष्ट सापडली आहे. त्यांना ब्लॅक बॉक्स मिळाला असून त्यातुन अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे. 01:07 ला: जहाज फोर्ट मॅकहेन्री चॅनेलमध्ये दाखल झाले होते. 01:26 ला VDR जहाजाच्या सिस्टम डेटाचे रेकॉर्डिंग सुरू केलं. आता 01:26 च्या दरम्यान जहाजाच्या पायलटने एक रेडिओ कॉल प्रसारित केला, डाळीजवळच्या टग्सना मदतीची विनंती केली. 01:27 ला पायलटने डालीला पोर्ट अँकर सोडण्याची सूचना दिली आणि पुढील स्टीयरिंग कमांड जारी केले. त्यानंतर पायलटने VHF रेडिओवर अहवाल दिला की ते पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि फ्रान्सिस स्कॉट कीच्या पुलाकडे जात आहे. 1:29ला ऑडिओ रेकॉर्डमध्ये पुलावर आदळणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू आले. या वेळी, MDTA डॅश कॅम ब्रिजचे दिवे निघताना दाखवतो. 1:2 ला पायलटने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळल्याचा अहवाल दिला