Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेश सैन्य पाकिस्तानसोबत लष्करी सराव करणार; भारतासाठी वाढते आवाहन

बांगलादेशने आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान आर्मीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. याशिवाय अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 25, 2024 | 03:57 PM
बांगलादेश सैन्य पाकिस्तानसोबत लष्करी सराव करणार; भारतासाठी वाढते आवाहन

बांगलादेश सैन्य पाकिस्तानसोबत लष्करी सराव करणार; भारतासाठी वाढते आवाहन

Follow Us
Follow Us:

ढाका: बांगलादेशने आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान आर्मीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर 53 वर्षांनी पुन्हा पाकिस्तानी सेना बांगलादेशच्या भूमीवर पाय ठेवणार आहे, परंतु वेगळ्या भूमिकेत. एका मेजर जनरलच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी विशेष टीम बांगलादेशी आर्मीला प्रशिक्षण देणार आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. याशिवाय अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचे प्रशिक्षण कार्यक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रशिक्षण कार्यक्रम 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. पहिला टप्पा मेमनशाही कॅंटमधील आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रिन कमांड (ATDC) मुख्यालयात होणार आहे, जो एक वर्ष चालेल. नंतरच्या टप्प्यात पाकिस्तानी सेना बांगलादेशच्या 10 कमांड्सना प्रशिक्षण देणार आहे. पाकिस्तानच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे चेअरमन जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी हे प्रशिक्षण प्रस्तावित केले होते, ज्याला बांगलादेशच्या आर्मी चीफ जनरल वकार-उज-जमान यांनी मान्यता दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – India Bangladesh Relations: भारताविरुद्ध ‘दहशतवादी कट’ रचणाऱ्या ‘या’ शत्रूची बांगलादेश न्यायालयाने केली सुटका

सैन्यसाहित्य खरेदी आणि युद्धाभ्यास

बांगलादेशने पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळाबारूद आणि स्फोटक साहित्य मागवले असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये 40,000 राउंड्स आणि 40 टन RDX मागवले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट आहे. बांगलादेशी नौदलही 2024 च्या फेब्रुवारीत पाकिस्तानसोबत “अमन-2025” या संयुक्त नौसैनिक युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. हे युद्धाभ्यास दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतात आणि 15 वर्षांनंतर बांगलादेश त्यात सहभागी होत आहे.

भारतासाठी वाढते आवाहन

विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकीमुळे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरवरील (चिकन नेक) धोका वाढू शकतो. हा कॉरिडॉर भारताच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांना देशाच्या मुख्य भागाशी जोडतो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानी लष्कराची उपस्थिती आणि कट्टरपंथीय गटांचा प्रभाव यामुळे भारताच्या पूर्वोत्तर प्रदेशांतील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, बांगलादेशची भौगोलिक स्थिती डोकलामजवळ असल्याने चीनलाही यातून फायदा होऊ शकतो.

मानवी हक्कांबाबत अमेरिकेची चिंता

तसेच, बांगलादेशातील हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल अमेरिका चिंतेत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी बांगलादेशचे पंतप्रधान यूनुस यांना मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. यूनुस यांनीही त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात पाकिस्तानविरोधी धोरण होते, पण सध्या परिस्थिती बदलली आहे. हे भारतासाठी आणि संपूर्ण उपखंडासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये तीव्र हवाई हल्ला; तालिबानच्या ठिकाणांना लक्ष्य, 15 जण ठार

Web Title: Bangladesh army to hold military training with pakistan nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • india
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
1

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
2

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
3

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
4

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.