Bangladesh News Sheikh Hasina's government was overthrown with foreign funds
ढाका: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी बांगलादेशात शेख हसीनांविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये परकीय निधी भूमिका समोर आली आहे. शेख हसीना यांच्या सत्तापलटासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनात परकीय निधीचा सहभाग असल्याचे एका अहवालात उघड करण्यात आले आहे. अहवालानुसार, विरोधी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक झाली असून मनी लॉंड्रिंगची आशंका निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार विद्यार्थी आंदोलनासाठी परकीय चलनाची मदत घेण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, SDM चे नेते आणि जातीय नागरिक समितीचे संस्थापक सरजीस आलम यांनी 7.56 दशलक्ष डॉलर भारतीय रुपयांमध्ये 65 कोटी टेथर या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवले आहेत. सरजीस आलम सामान्य कुटुंबातून येताता, यामुळे इतक्या मोठ्या प्रमामात गुंतवणूक केल्यामुळे परकीय मदतीची आशंका आहे.
तसेच अंतरिम सरकारचे IT सल्लागार आणि ADSM समन्वयक नाहिद इस्लामा यांनी 2.04.64 बिटकॉइन गुंतवले आहेत, म्हणजेच 17.17 दशलक्ष डॉलर जे भारतीय रुपयांमध्ये 147च्या आसपास होतात. यामुळे परकीय निधीच्या सहभागाचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रचंड गुंतवणूकीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बांगलादेशातील चळवळ परदेशी निधीतून
अहवालानुसार, अनेक विद्यार्थी नेत्यांनाही मोठ्या प्रमाणात परकीय चलनामध्ये गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. अंतरिम सरकारचे प्रेस सचिव आणि पत्रकार शफीकुल आलम यांनी सुमारे 93.06 बिटकॉइन म्हणजेच 86 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आंदोलनात सहभागी व्यक्तींना परकीय मदत मिळाली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
अहवालात उघड करण्यात आले आहे की, बांगलादेशात नेतृत्तव परिवर्तनासाठी सुरु असलेले आंदोलन परकीय निधीमुळे दूषित झाले. सध्या बांगलादेशला अनेक आरोपांना सामोरे जावे लागत आहे, यामध्ये हिंदू व इतर अल्पसंख्यांक धर्मींयांवरील अत्याचार, महिलांवरील आणि मुलांवरील अत्याचार यांचा समावेश आहेच, यासोबतच मनी लॉंड्रिंगचाही आरोप आता बांगलादेशवर करण्यात आला आहे.
विद्यार्थी आंदोलन
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन सुरु झाले होते. शेख हसीना सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. यामुळे शेख हसीना यांना देश सोडवा लागला. सध्या बांगलादेशाचे नेतृत्व मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अंतरिम सरकाच्या हाती आहे. विद्यार्थी संघटनेने देखील एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
सध्या बांगलादेशमधील परिस्थिती अधिक गुंतागुतीची आहे. परकीय निधी आणि क्रिप्टोकरन्सीच्या आरोपामुळे , मनी लॉंड्रिंगची आशंका आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.