हमासला मोठा धक्का; इस्त्रायली हवाई हल्ल्यात 'या' वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या इस्त्रायल-हमासमध्ये 42 दिवसांच्या युद्धविरानंतर पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. इस्त्रायल सतत हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे. इस्त्रायली सुरक्षा दलाने (IDF) दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा एक वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायली सुरक्षा दलाने दावा केला आहे की, हमासचा लष्करी गुप्तचर प्रमुख ओसामा तबाशचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इस्त्रायली लष्कर (IDF) आणि अंतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेट यांनी संयुक्त निवेदन जारी करुन याची माहिती दिली. तबाश हा हमासच्या वरष्ठ कमांडरपैकी एक होता. तबाश ने खान युनूस ब्रिगेडमध्ये बटालियन कमांडर म्हणून काम केले आहे. हमासच्या युनिटचे नेतृत्व देखील केले आहे. मात्र, हमासने अद्याप तबाशच्या मृत्यूची कोणतीही अधिकृत माहिती जारी केली नाही.
कोण होता ओसामा तबाश?
हमासच्या लष्करी कारवायांमध्ये तबाशने अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्त्रायल विरोधी अनेक हल्ल्यांचे नियोजन तबाशने केले आहे. यामध्ये 2005 मध्ये गाझा पट्टीतील गुश कातिफ जंक्शनवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा समावेश होता. या हल्ल्यात इस्त्रायलच्या सुरक्षा एजन्सी शिन बेटच्या ओडेड शेरॉनचा मृत्यू झाला होता.
हमासच्या लष्करी कायवायांचे मुख्य रणनीतिकार
IDF आणि शिन बेट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तबाशने हमासची युद्धनीती विकसित केली. हमासच्या लष्करी गुप्तचर युनिटचे नेतृत्व तबाश करत होताय इस्त्रायलच्या गुप्तचर ठिकाणांची माहिती गोळा करुन त्यांच्यावर हल्ले करत. दोन वर्षापूर्वी 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या इस्त्रायलवरील हमासच्या हल्ल्यासाठी तबाशच्या युनिटने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हमासला मोठा धक्का
ओसामा तबाशच्या मृत्यूला हमाससाठी मोठा धक्का मानला जात आहे. IDF ने म्हणण्यानुसार, तबाशच्या मृत्युमुळे हमासची गुप्तचर माहिती गोळा करुन इस्त्रायलवर हल्ल्या करण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या युद्धात तबाशच्या तुकडीने गाझामधील अनेक इस्त्रायली तळांवर लष्करी कारवाया केल्या आहेत. यामध्ये इस्त्रायलच्या सैन्यावर पाळत ठेवणे, हल्ल्यांचे आदेश आणि हमासच्या धोरणात्मक योजनांना आकार देणे ही जबाबदारी तबाश पार पाडत होता. मात्र त्याच्या मृत्यूमुळे हमास कमकुवत झाला आहे.
इस्त्रायलचे गाझात ग्राउंड ऑपरेशन सुरु
बुधवारी (19 मार्च 2025) इस्रायली हवाई हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, इस्रायली सैन्याने गाझामध्ये जमिनीवरील लक्ष्यित कारवाई सुरू केली, ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण गाझामधील बफर झोन तयार केला जात आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) स्पष्ट केले आहे की गाझा पट्टीतील सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मध्य आणि दक्षिण गाझामधील जमिनीवरील हालचालींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या ग्राउंड ऑपरेशन्सच्या अंतर्गत नेत्झारिम कॉरिडॉरवरील सैन्य नियंत्रण वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण गाझामधील संपर्क थोड्या प्रमाणात खंडित झाला आहे.