Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL

First Naval Attack : बलुचिस्तान मुक्ती सेनेने (बीएलए) जिवानीजवळ पाकिस्तान तटरक्षक दलाच्या गस्ती बोटीवर आपला पहिला सागरी हल्ला चढवला आहे. या भीषण चकमकीत तीन पाकिस्तानी सैनिक शहीद झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 15, 2026 | 10:40 AM
bla first naval attack jiwani pakistan coast guard hammal force 2026

bla first naval attack jiwani pakistan coast guard hammal force 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बीएलएचा पहिला सागरी स्ट्राइक
  • ‘हम्मल’ नौदल शाखेची स्थापना
  • ग्वादर बंदराजवळ धोका वाढला

BLA first naval attack Pakistan Coast Guard : बलुचिस्तानमधील संघर्षाने आता एक अत्यंत धोकादायक आणि ऐतिहासिक वळण घेतले आहे. जमिनीवर पाकिस्तानी सैन्याला (pakistan army) सळो की पळो करून सोडल्यानंतर, आता बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) आपला मोर्चा अरबी समुद्राकडे वळवला आहे. रविवारी सकाळी पाकिस्तान-इराण सागरी सीमेजवळील जिवानी शहरात बीएलएने पाकिस्तानी तटरक्षक दलावर आपला पहिला सागरी हल्ला (Naval Attack) केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन जवान जागीच ठार झाले असून, यामुळे पाकिस्तानच्या सागरी सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्या आहेत.

‘हम्मल सागरी संरक्षण दल’: बीएलएचे नवीन आणि घातक शस्त्र

या हल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बीएलएने स्थापन केलेली ‘हम्मल सागरी संरक्षण दल’ ही नवीन नौदल शाखा. पहिल्यांदाच एखाद्या बंडखोर संघटनेने अधिकृतपणे आपली नौदल शाखा जाहीर करून थेट समुद्रात पाकिस्तानी सैन्याला आव्हान दिले आहे. बीएलएने स्पष्ट केले आहे की, बलुच सागरी संसाधनांची होणारी लूट थांबवण्यासाठी हे दल आता पूर्णपणे कार्यरत झाले आहे. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलुच यांनी याला त्यांच्या युद्धनीतीमधील “युगप्रवर्तक बदल” म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lebanon Crisis: युगांतराची नांदी! इस्रायल-लेबनॉन दशकांनंतर पहिल्यांदाच एका टेबलवर; मार्को रुबियो यांनी चर्चेला म्हटले ऐतिहासिक

जिवानीजवळ थरार: १० मिनिटांत ३ सैनिकांचा खात्मा

ही घटना रविवारी सकाळी १० वाजता जिवानी भागातील मिल तियाब नावाच्या ठिकाणी घडली. पाकिस्तानी तटरक्षक दलाची बोट नियमित गस्तीवर असताना, अचानक वेगाने आलेल्या बीएलएच्या ‘स्पीडबोट्स’नी त्यांना घेराव घातला. जड मशीनगनने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तटरक्षक दलाचे नाईक अफझल, शिपाई जमील आणि शिपाई उमर यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा व्हिडिओ बीएलएच्या ‘हक्कल’ मीडिया विंगने सोशल मीडियावर प्रसारित केला असून, त्यातील दृश्यांनी पाकिस्तानात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

Dammmmmm 💦 pic.twitter.com/0aPbu7xIPD — War Flash (@WarFlash_2630) April 13, 2026

credit – social media and Twitter

ग्वादर आणि CPEC सुरक्षेवर टांगती तलवार

हा हल्ला ज्या ठिकाणी झाला, तो भाग सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ग्वादर बंदराजवळ आहे. ग्वादर हे चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे (CPEC) केंद्रस्थान आहे. बीएलएच्या या सागरी क्षमतेमुळे आता या प्रकल्पासाठी समुद्रातून येणारी मालवाहतूक आणि चिनी जहाजांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बलुच बंडखोर आता केवळ जमिनीवरच नाही, तर सागरी व्यापारी मार्गांवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Art Day: जगभरातील कलाकारांना सलाम! का साजरा केला जातो ‘जागतिक कला दिन’? जाणून घ्या दा विंची यांच्याशी असलेले खास नाते

पाकिस्तानी लष्कराची धावपळ आणि नवीन सुरक्षेचे आव्हान

या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी नौदल आणि तटरक्षक दलाने किनारपट्टीच्या भागात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, समुद्रात गनिमी काव्याने (Guerrilla Warfare) हल्ले करण्याची बीएलएची वाढलेली क्षमता ही पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला भविष्यातील अधिक मोठ्या सागरी युद्धाची नांदी असू शकतो. बलुच संसाधनांची लूट रोखण्यासाठी आता अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीएलएने पाकिस्तानवर पहिला सागरी हल्ला कुठे केला?

    Ans: बीएलएने पाकिस्तान-इराण सागरी सीमेजवळील जिवानी या किनारपट्टीच्या शहराजवळ पाकिस्तान तटरक्षक दलावर पहिला सागरी हल्ला केला.

  • Que: 'हम्मल सागरी संरक्षण दल' काय आहे?

    Ans: हे बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) स्थापन केलेले नवीन नौदल दल आहे, ज्याचे उद्दिष्ट बलुच सागरी संसाधनांचे संरक्षण करणे हे आहे.

  • Que: या हल्ल्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: या सागरी हल्ल्यात पाकिस्तान तटरक्षक दलाचे ३ जवान (नाईक अफझल, शिपाई जमील आणि शिपाई उमर) ठार झाले आहेत.

Web Title: Bla first naval attack jiwani pakistan coast guard hammal force 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • pakistan army
  • Pakistan News

संबंधित बातम्या

दलाली करणं पाकिस्तानला पडणार महागात, सौदी अरेबियाने ठगलं! ईराण युद्ध न थांबल्यास Pakistan होणार नष्ट
1

दलाली करणं पाकिस्तानला पडणार महागात, सौदी अरेबियाने ठगलं! ईराण युद्ध न थांबल्यास Pakistan होणार नष्ट

Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली! सरकारने थेट बजावली नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?
2

Asha Bhosle यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलला नडली! सरकारने थेट बजावली नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

India UAE Ties : ‘भारत हा एक खरा आणि शूर मित्र, इस्लामी जिहादी दहशतवाद्यांना…’; पाकिस्तानवर UAEचा मोठा आरोप
3

India UAE Ties : ‘भारत हा एक खरा आणि शूर मित्र, इस्लामी जिहादी दहशतवाद्यांना…’; पाकिस्तानवर UAEचा मोठा आरोप

Pak Navy Ship Blast : शाहबाज-मुनीरला मोठा झटका! अरब समुद्रात पाकिस्तान नौदलाच्या जहाजावर थेट हल्ला, जगभरात खळबळ
4

Pak Navy Ship Blast : शाहबाज-मुनीरला मोठा झटका! अरब समुद्रात पाकिस्तान नौदलाच्या जहाजावर थेट हल्ला, जगभरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.