Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS2026 : ब्रिक्समध्ये मोठी फूट! ट्रम्पच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेने घेतली माघार; इराणबाबत घेतला ‘हा’ आश्चर्यकारक निर्णय

BRICS Naval Exercise: ब्रिक्सच्या पहिल्या नौदल सराव "विल फॉर पीस" वर ट्रम्पचा दबाव भारी असल्याचे दिसून येते. दक्षिण आफ्रिकेने इराणला माघार घेण्यास सांगितले, परंतु इराणी युद्धनौकांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 14, 2026 | 04:23 PM
brics naval exercise south africa iran trump pressure will for peace 2026

brics naval exercise south africa iran trump pressure will for peace 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा प्रचंड दबाव
  • दक्षिण आफ्रिकेची इराणला विनंती
  • इराणचे उघड आव्हान

BRICS naval exercise 2026 Cape Town : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन किनारपट्टीवर सुरू असलेला ब्रिक्स (BRICS) देशांचा पहिला संयुक्त नौदल सराव “विल फॉर पीस २०२६” (Will for Peace 2026) सध्या जागतिक राजकारणाचे केंद्र बनला आहे. चीनच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सरावात रशिया, युएई आणि दक्षिण आफ्रिका सहभागी आहेत. मात्र, इराणच्या सहभागावरून या गटात मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका धमकीने दक्षिण आफ्रिकेला इतके जेरीस आणले आहे की, त्यांनी आपल्या मित्रराष्ट्रालाच (Iran) सरावातून माघार घेण्याची विनंती केली.

डोनाल्ड ट्रम्प यांची ती ‘टॅरिफ’ धमकी

इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान ट्रम्प यांनी एक कठोर विधान केले आहे. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर जाहीर केले की, “इराणशी कोणताही व्यापार करणाऱ्या देशाने अमेरिकेला २५% टॅरिफ भरण्यासाठी तयार राहावे.” दक्षिण आफ्रिका सध्या अमेरिकेच्या ‘अगोआ’ (AGOA) कायद्यांतर्गत शुल्कमुक्त व्यापाराचा लाभ घेते. हा लाभ धोक्यात येऊ नये म्हणून दक्षिण आफ्रिकेने इराणला या लष्करी सरावात सक्रिय सहभाग घेण्याऐवजी केवळ ‘निरीक्षक’ म्हणून राहण्यास सुचवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

इराणचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि दक्षिण आफ्रिकेची कोंडी

सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दबावापुढे इराण झुकल्यासारखे वाटले. मात्र, मंगळवारी केपटाऊनच्या समुद्रात चित्र बदलले. रशिया आणि चीनच्या जहाजांसोबत इराणची प्रगत युद्धनौका ‘IRIS Makran’ आणि इतर दोन जहाजे प्रत्यक्ष सरावात उतरली. इराणचा हा पवित्रा ट्रम्प यांच्या ‘दादागिरी’ला थेट उत्तर मानले जात आहे. इराणने केवळ सहभागच नोंदवला नाही, तर ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या जहाजाचा समावेश करून अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे.

Iran’s largest naval vessel, IRIS Makran, has arrived in the vicinity of Cape Town’s False Bay alongside Chinese warships and with Russian vessels en route, as the 3 BRICS navies prepare for the joint “Will for Peace 2026” (Mosi III) exercises. Follow: https://t.co/0EMmcJsEtj pic.twitter.com/oihtYRcqdI — PressTV Extra (@PresstvExtra) January 10, 2026

credit : social media and Twitter

भारत या सरावापासून लांब का?

ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असूनही भारताने या सरावात भाग घेतलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, भारताने ट्रम्प प्रशासनाशी असलेले आपले धोरणात्मक संबंध आणि चीनसोबतचा सीमावाद लक्षात घेता हा ‘धोरणात्मक निर्णय’ घेतला आहे. भारताच्या अनुपस्थितीमुळे ब्रिक्समधील लष्करी एकजूट कच्ची असल्याची चर्चा पाश्चात्य माध्यमांमध्ये रंगू लागली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

व्यापारी हित की सार्वभौमत्व?

दक्षिण आफ्रिकेची अवस्था सध्या ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. एका बाजूला ब्रिक्सचे सदस्य म्हणून चीन-रशियाशी मैत्री टिकवायची आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा धोका पत्करायचा नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण मंत्रालयाने इराणच्या सहभागाबाबतचे सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्याने या गोंधळावर शिक्कामोर्तब झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: . दक्षिण आफ्रिकेने इराणला माघार घेण्यास का सांगितले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याने दक्षिण आफ्रिकेला आपल्या व्यापारी हिताची भीती वाटली.

  • Que: "विल फॉर पीस" सरावात कोणकोणते देश सहभागी आहेत?

    Ans: यात चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका, युएई आणि इराण (विवादास्पद) सहभागी आहेत. भारताने यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

  • Que: इराणने दक्षिण आफ्रिकेचे ऐकले का?

    Ans: सुरुवातीला सहमती दर्शवूनही, इराणने प्रत्यक्ष सरावात आपल्या युद्धनौका उतरवून दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका दोघांनाही पेचात पाडले आहे.

Web Title: Brics naval exercise south africa iran trump pressure will for peace 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Brics Council
  • iran
  • South Africa
  • World War 3

संबंधित बातम्या

US-IranWar: ‘आम्ही इराणला धोका देणार नाही पण…’ असीम मुनीरने बोलावली ‘इमर्जन्सी’ मीटिंग; युद्धात पाकिस्तान ‘असा’ ठरणार बळीचा बकरा
1

US-IranWar: ‘आम्ही इराणला धोका देणार नाही पण…’ असीम मुनीरने बोलावली ‘इमर्जन्सी’ मीटिंग; युद्धात पाकिस्तान ‘असा’ ठरणार बळीचा बकरा

Iran Protests 2026: ‘माझ्यावर एक उपकार करा, थोडी लाज बाळगा’ जर्मनी- इराणमध्ये शब्दयुद्ध तीव्र; खामेनेई सरकारला लागला सत्तासुरुंग
2

Iran Protests 2026: ‘माझ्यावर एक उपकार करा, थोडी लाज बाळगा’ जर्मनी- इराणमध्ये शब्दयुद्ध तीव्र; खामेनेई सरकारला लागला सत्तासुरुंग

Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील
3

Iran Protest 2026: रस्ते रक्ताने माखले, शवागारे भरली; इराणमधील नरसंहाराचा ‘हा’ खळबळजनक अहवाल वाचून डोळे पाणावतील

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण
4

Iran Protests : ‘हल्ला केल्यास स्वतःचीच कबर खोदून घ्याल’ इराणच्या समर्थनात उभे ठाकले ‘हे’ तीन शक्तिशाली देश; डोनाल्ड ट्रम्प हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.