Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Order: SAARCप्रमाणे BRICSही संपेल? इराणचा हट्ट अन् पाकिस्तानची घुसखोरी; PM मोदींसमोर ‘हे’ सर्वात मोठे राजनैतिक संकट

BRICS Summit 2026: सार्क आणि क्वाडनंतर, ब्रिक्सचे भवितव्यही धोक्यात आले आहे का? इराण विवाद आणि पाकिस्तानच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, २०२६ ची शिखर परिषदेसाठी भारतासमोर एक मोठे आव्हान आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2026 | 11:07 AM
brics summit 2026 india presidency challenges iran pakistan conflict analysis

brics summit 2026 india presidency challenges iran pakistan conflict analysis

Follow Us
Follow Us:
  • ब्रिक्सवर विघटनाचे सावट
  • सार्कसारखी अवस्था होणार?
  • भारताचा मुत्सद्देगिरीचा कस

BRICS Summit 2026 India : आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दक्षिण आशियाई देशांची संघटना ‘सार्क’ (SAARC) आधीच पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळे इतिहासजमा झाली आहे. त्यानंतर ‘क्वाड’ची गती मंदावली आणि आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) २०२६ शिखर परिषदेवरही काळे ढग जमा झाले आहेत. भारताकडे यावर्षीचे अध्यक्षपद असूनही, सदस्य देशांमधील अंतर्गत कलह ही भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

इराणचा ‘अँटी-वेस्ट’ अजेंडा अन् भारताची अडचण

इराण सध्या अमेरिकेच्या निर्बंधांनी आणि युद्धाच्या आगीत होरपळत आहे. अशा परिस्थितीत, इराणला ब्रिक्स या मंचाचा वापर पाश्चात्य देशांविरुद्ध एक हत्यार म्हणून करायचा आहे. इराणचा असा आग्रह आहे की, ब्रिक्सने अमेरिकेच्या धोरणांचा जाहीर निषेध करावा. मात्र, भारताचे अमेरिकेसोबतचे वाढते व्यापारी आणि धोरणात्मक संबंध पाहता, भारताला ब्रिक्सकडे ‘पाश्चात्य-विरोधी’ गट म्हणून पाहिले जाणे मान्य नाही. रशिया आणि चीन इराणच्या बाजूने झुकलेले असताना, भारताला हा राजनैतिक समतोल साधणे अत्यंत कठीण जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WHCD Shooting : ‘मी रेपिस्ट नाही’ लाइव्ह टीव्हीवर भडकले डोनाल्ड ट्रम्प; हल्लेखोराच्या पत्रातील घाणेरड्या आरोपांना दिलं उत्तर

पाकिस्तानची एन्ट्री: सार्कच्या इतिहासाची पुनरावृत्ती?

ब्रिक्समधील सर्वात मोठा तणाव पाकिस्तानच्या प्रवेशावरून निर्माण झाला आहे. चीन आपल्या जुन्या सवयीनुसार पाकिस्तानला या शक्तिशाली गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताचा याला तीव्र विरोध आहे, कारण सार्कमध्ये पाकिस्तानने ज्या प्रकारे अडथळ्याचे धोरण स्वीकारले होते, तशीच पुनरावृत्ती ब्रिक्समध्ये होण्याची दाट शक्यता आहे. जर पाकिस्तान ब्रिक्समध्ये आला, तर भारतासाठी ही संघटना केवळ वादाचा अड्डा बनून राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Excl: UAE-Iran differences and India’s plans to dilute language on Israel-Palestine derail joint statement at BRICS meet.While UAE-Iran acrimony was expexted, delegates were surprised by Delhi moves, opposed by almost all others. Reporting @the_hindu https://t.co/DLRrmsplxL — Suhasini Haidar (@suhasinih) April 27, 2026

credit – social media and Twitter

क्वाडपासून ब्रिक्सपर्यंत: भारताची बदलती भूमिका

केवळ ब्रिक्सच नाही, तर २०२५ मध्ये होणारी ‘क्वाड’ शिखर परिषदही भारताच्या अध्यक्षतेखाली होऊ शकली नाही. व्यापार शुल्क आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे भारताचा क्वाडमधील उत्साह कमी झाला आहे. भारताला असे वाटते की, या संघटनांचा वापर केवळ अमेरिकेच्या फायद्यासाठी न होता भारताच्या राष्ट्रीय हितासाठी झाला पाहिजे. आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी कोणता पवित्रा घेतात, यावर केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?

पुढचे पाऊल काय?

भारतासमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. एकीकडे रशिया-चीनच्या दबावाला तोंड देणे आणि दुसरीकडे अमेरिकेसोबतचे संबंध टिकवून ठेवणे. जर सदस्य देश इराण आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर एकमतावर पोहोचले नाहीत, तर सप्टेंबरमधील शिखर परिषद केवळ नावापुरती उरेल. भारताची मुत्सद्देगिरी या मंचाला विघटनापासून वाचवू शकेल का, हाच २०२६ मधील सर्वात मोठा प्रश्न आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ ब्रिक्स शिखर परिषद कोठे आणि कधी होणार आहे?

    Ans: २०२६ ब्रिक्स शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली होणार असून, सप्टेंबर महिन्यात महत्त्वाची बैठक नियोजित आहे.

  • Que: भारत पाकिस्तानच्या ब्रिक्स प्रवेशाला विरोध का करत आहे?

    Ans: पाकिस्तानच्या अडथळा आणणाऱ्या धोरणांमुळे सार्क संघटना अपयशी ठरली, तशीच परिस्थिती ब्रिक्समध्ये निर्माण होऊ नये म्हणून भारत विरोध करत आहे.

  • Que: इराणचा ब्रिक्समध्ये कोणता मुख्य मुद्दा आहे?

    Ans: इराणला ब्रिक्स मंचाचा वापर करून अमेरिकन निर्बंधांचा आणि पाश्चात्य धोरणांचा निषेध करायचा आहे.

Web Title: Brics summit 2026 india presidency challenges iran pakistan conflict analysis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Brics Council
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
1

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 
2

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता
3

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
4

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.